पुणे : ‘ओएलएक्स’ वरुन ‘आयफोन’ विकण्याच्या बहाण्याने फसवणारे जेरबंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

ओएलएक्स वरुन आयफोन -६ ची विक्री करण्याचे अमिष दाखवून नागरिकांना फसवणाऱ्या दोघांना पुणे सायबर क्राईम सेलच्या पथकाने राजस्थानमधून अटक केली. अटक केलेल्या आरोपींकडू बँकेचे पासबूक, मोबाईल, मोबाईल सीमकार्ड जप्त करण्यात आले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपी पैकी एक जण अल्पवयीन आहे. आरोपींनी हिंजवडी आणि विमानतळ येथील नागरिकांची फसवणूक केली होती.

हिंजवडी येथील एका तक्रारदाराने ओएलएक्सवर आयफोन -६ विक्रीसाठी असल्याची जाहीरात पाहून जाहीरातीमधील मोबाईल नंबरवर संपर्क साधला. समोरील व्यक्तीने तक्रारदाराला व्हॉटस्अॅप नंबर देऊन आपण भारतीय सैन्यदलातील जवान असल्याचे खोटे सांगितले. त्यांना देण्यात आलेली माहिती खरी वाटावी यासाठी त्याने आधार कार्ड व कँटीन कार्ड तक्रारदारांना व्हॉटस्अॅपवर पाठवले. त्यामुळे तक्रारदाराचा त्याच्याव विश्वास बसला. तक्रादाराला आयफोन -६ चौदा हजार रुपयांना देण्याचा ठरला. ठरलेल्या रक्कमेपैकी अर्धी रक्कम आगोदर देण्याचे ठरले. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराने सात हजार रुपये पेटीएमद्वारे पाठवले. त्यानंतर तक्रारदाराने वारंवार फोन केला मात्र त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. काही दिवासांनी फोन बंद करण्यात आला. पैसे देऊनही मोबाईल मिळाला नसल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

[amazon_link asins=’B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1dfc3241-b5c2-11e8-92e5-53f86c9e2ede’]

दरम्यान, अशाच प्रकारची घटना विमानतळ येथे घडली. या घटनेत आरोपींनी तक्रारदाराकडून १६ हजार रुपये घेतले होते. दोन्ही गुन्ह्याचा तपास करत असताना पुणे सायबर क्राईम सेलच्या पोलिसांना दोन्ही आरोपींची फसवणूक करण्याची पद्दत एकच असल्याचे समजले. सायबर सेलच्या पोलिसांनी तांत्रीक बाबीचा तपास केला असता आरोपी राजस्थानमध्ये असल्याची माहिती मिळाली. सायबर क्राईम सेलचे एक पथक तयार करुन आरोपींना पकडण्यासाठी राजस्थान येथे रवाना करण्यात आले होते. पथकाने आरपींचा शोध घेऊन एका अल्पवयीन मुलासाह तौफिक दिनु खान (वय-२२ रा. देसुला खोड, जि. अलवार, राज्यस्थान) येथून अटक केली. तौफिक खान याला विमानतळ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे तर अल्पवयीन मुलाची सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.

[amazon_link asins=’B0756Z53JN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2667ce44-b5c2-11e8-a79f-b388e88a4981′]

ही कारवाई पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम्, पोलीस सह आयुक्त शिवाजी बोडखे, अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे प्रदिप देशपांडे, पोलीस उपायुक्त आर्थिक व सायबर ज्योतीप्रिया सिंह, सहायक पोलीस आयुक्त निलेश मोरे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राधिका फडके, पोलीस उप निरीक्षक किरण औटी, पोलीस कर्मचारी राजकुमार जाबा, नवनाथ जाधव, किरण अब्दागिरे, अनुप पंडीत, योगेश वाव्हळ व ज्योती दिवाणे यांच्या पथकाने केली.

महिलांसमोर हस्तमैथुन करणाऱ्या विकृतीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नागरिकांना आवाहन
पुणे सायबर क्राईम सेलच्या वतीने नागिराकांना आवाहन करण्यात आले आहे. अशा प्रकारे ओएलएक्स वरुन व पेटीएम नंबर ९६४९७१०४७१, ८७४२८६१०४१ व मोबाईल नंबर ९४१४१००९२६, ८०९४२३३४६४ वरुन फसवणूक झाली असल्यास त्यांनी तात्काळ हिंजवडी व विमानतळ पोलीस ठाण्यात संपर्क साधावा.
पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like