वर्तमान पत्रात जाहिरात देवून घरामध्येच ‘स्पा’च्या नावाखाली चालु असलेल्या ‘सेक्स रॅकेट’चा ‘पर्दाफाश’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मुंबईमध्ये एका आलिशान हॉटेलमध्ये छापा टाकून पोलिसांनी या ठिकाणी चालणाऱ्या वेश्या व्यवसायाचा भांडाफोड केला आहे. या ठिकाणी छापा टाकून पोलिसांनी सहा जणांना अटक आलेली आहे. त्याचबरोबर पोलिसांनी घरांवर देखील छापे टाकून या प्रकरणात कारवाई केली आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपी नागरिकांना घरात मालिशची सेवा देण्याचे लालच दाखवून हे काम करत असत. मुंबईच्या यूनिट ९ च्या गुन्हेगारी शाखेने अंधेरीतील एका पंचतारांकित हॉटेलवर छापा टाकून वेश्याव्यवसाय करून घेतल्या जाणाऱ्या तीन महिलांची सुटका केली.

पोलिसांनी या प्रकरणात एका खासगी कंपनीचा मालक असलेल्या रजनीश सिंह याला अटक केली आहे. त्याचबरोबर कंपनीत काम करणाऱ्या पाच महिलांना देखील अटक केली आहे. छापेमारीदरम्यान पोलिसांना ४.७० लाख रुपयाची रोकड सापडली.

गुन्हे शाखेच्या निरीक्षक आशा कोरके यांनी सांगितले कि, एका वृत्तपत्रात जाहीर झालेल्या एका जाहिरातीनुसार पोलिसांना या टोळीचा तपास लागला.

दरम्यान, या जाहिरातीत घरात मालिशची सुविधा मिळेल असे सांगितले जात होते. मागील १० महिन्यांपासून या ठिकाणी हे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. एका पोलीस अधिकाऱ्याने या जाहिरातीतील नंबरवर संपर्क साधला. त्यानंतर तिथे तीन महिला पाठवण्यात आल्या. यानंतर पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला. या सहा आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –