१५०० रुपयांची लाच स्विकारताना पोलीस हवालदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

गोंदिया : पोलीसनामा ऑनलाईन – चारचाकी वाहनाच्या विम्याच्या दाव्यासाठी एनसीआर प्रत व पंचनामा देण्यासाठी दीड हजार रुपयांची लाच स्विकारणाऱ्या पोलीस हवालदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज (सोमवार) दुपारी सालेकसा पोलीस ठाण्यात करण्यात आली. रमेश श्रीराम बिसेन (वय-५०) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या हवालदाराचे नाव आहे.

तक्रारदार यांची चारचाकी गाडी आहे. २४ मे रोजी तक्रारदार यांनी त्यांची गाडी लग्नाच्या वरातीसाठी भाड्याने दिली दिली होती. यावेळी अनोळखी व्यक्तींच्या भांडणात त्यांच्या गाडीचे नुकसान झाले होते. त्यामुळे तक्रारदार यांनी सालेकसा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारदार यांना गाडीचा विम्याचा दावा करण्यासाठी एनसीआर प्रत आणि पंचनामा प्रतीची गरज होती. त्यासाठी त्यांनी हवालदार बिसेन यांच्याकडे कागदपत्रांची मागणी केली. त्यावेळी हवालदार बिसेन याने तक्रारदाराकडे दोन हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीमध्ये दीड हजार रुपये देण्याचे ठरले होते.

तक्रारदारांनी याची तक्रार गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे गुरुवारी (दि. १३) केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेच्या मागणीची पडताळणी केली. यावेळी दीड हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. आज दुपारी सालेकसा पोलीस ठाण्यात पथकाने सापळा रचला. हवालदार बिसेन याला लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. हवालदार बिसेन याच्यावर सालेकसा पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्प लाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

आरोग्यविषयक वृत्त (www.arogyanama.com) 

का येतो अचानक ‘लठ्ठपणा’ ? जाणून घ्या कारणे

अचानक ‘लठ्ठपणा’ का येतो ? जाणून घ्या कारणे 

टाच दुखीने त्रस्त आहात? ‘या’ घरगुती उपायांनी मिळेल आराम 

टाच दुखीने त्रस्त आहात? करा ‘हे’ उपाय 

बेलाच्या पानात लपलय लोकसंख्या रोखण्याचं ‘गुपित’, ‘कॅन्सर’ आणि ‘लिव्हर’साठी देखील फायदाच