पूजा चव्हाण प्रकरणावर प्रश्न विचारताच पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता उठून गेले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात प्रसार माध्यमांनी प्रश्न विचारताच पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेतून हासत मुखाने काढता पाय घेतला. त्यांच्या या कृतीने मात्र पोलीस दलात वेगळीच चर्चा सुरू आहे.

परळीच्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला महिना होत आला आहे. पण अद्याप त्यात गुन्हा दाखल झालेला नाही. तर आणखी देखील पोलीस तपास करत असल्याचे सांगत आहेत. दरम्यान काल पूजा चव्हाण हिच्या शवविच्छेदन अंतिम अहवाल पुणे पोलिसांना मिळाला. नेमकी आज पुणे पोलिसांनी केलेल्या एका चांगल्या कामगीची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. ही पत्रकार परिषद झाल्यानंतर प्रसार माध्यमांनी पोलीस आयुक्त गुप्ता यांना पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात प्रश्न विचारला. त्यावेळी मात्र आयुक्त पत्रकार परिषद सोडून थेट खुडचीवरून उठून हासत मुखाने निघून गेले. त्यानंतर त्यांच्यामागे इतर अधिकाऱ्यांनी देखील काढता पाय घेतला.