पोलीस आयुक्तांचा येरवडा DB पथकावर रामबाण ईलाज, महिलांची नियुक्ती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या काही महिन्यांपासून गाजत असलेले आणि संशयात बोहर्‍यात असणार्‍या येरवडा पोलीस ठाण्यातील डीबीचे (तपास पथक) कारनामे पोलीस आयुक्तांच्या कानावरती गेले अन हे पथकच बरखास्त केले आहे. पथक बरखास्त केल्यानंतर डीबी पथकात सामिल होण्यासाठी गुडघ्याला बाशिंग लावून थांबलेल्यांना धक्का देत आयुक्तांनी यावर रामबान उपाय काढत येथील पथक महिलांचेच तयार केले आहे. पुणे शहर पोलीस दलात प्रथमच डीबी पथक महिलांचे ठरले आहे. यामुळे पोलीस दलातही मोठी चर्चा सुरू झाली आहे.

शहरात 30 पोलीस ठाणे आहेत. पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडणार्‍या गंभीर गुन्ह्यांचा तपास करणे आणि ते उघडकीस आणणे. तसेच, हद्दीतील सराईतांवर लक्ष ठेवणे यासोबतच फरार व पाहिजे आरोपींना पकडण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात डीबी पथक असते. याठिकाणी सहायक निरीक्षक किंवा उपनिरीक्षक अधिकारी आणि कर्मचारी असतात.

ज्या पोलीस ठाण्यातील डीबी पथक सक्षम असते तेथील गुन्हेगारीही कमी असल्याचे म्हटले जाते. गुन्हे शाखेपेक्षा सरस कामगिरी काही डीबी पथक करतात. अशी उदाहरणे देखील आहेत. शहरातील 30 पोलीस ठाण्यांपैकी काहीच अशी दबंग डीबी पथके आहेत.

तत्पुर्वी गेल्या काही महिन्यांपासून येरवडा पोलीस ठाणे वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहत आहे. कामसोडून भलतेच उद्दोग सुरू होते. गुन्हेगारांसोबतची उटबस, तोडपाणी हे सर्व कारनामे पोलीस आयुक्तांच्या कानावर गेले. त्यानंतर तातडीने आयुक्तांनी पुर्ण डीबी पथकच बरखास्त केले.

डीबी पथक बरखास्त केल्यानंतर येरवडा पोलीसांना नवीन डीबी पथकात महिला अधिकारी व कर्मचारी नेमण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर आता येरवडा डीबी पथकात महिला राज आले आहे. या तपास पथकाची जबाबदारी उपनिरीक्षक शुभांगी मगदूम यांच्याकडे देण्यात आली आहे. तर, या पथकामध्ये वंदना यादव, उर्मीला दौंन्डे, वनिता पाटील, शिवानी जगताप, निर्मला रासकर, सोनाली कांबळे, पल्लवी नरूटे यांची नेमणूक करण्यात आली आहे.