Police Committed Suicide in Chandrapur | चंद्रपूरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या, पोलीस दलात खळबळ

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Police Committed Suicide in Chandrapur | चंद्रपूर पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याने राहत्या घरात आत्महत्या केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. सुशील कुंबलवार Sushil Kumblewar (वय-43) असे आत्महत्या (Police Committed Suicide in Chandrapur) करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (दि.3) सकाळी उघडकीस आली.

 

सुशील कुंबलवार हे राजुरा पोलीस ठाण्यात (Rajura Police Station) कार्यरत होते. त्यांनी शुक्रवारी सकाळी राहत्या घरात गळफास (Hanging) घेऊन आत्महत्या केली. मानसिक त्रासातून त्यांनी आत्महत्या करण्यासारखे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा परिसरात आहे.

 

ही दुर्दैवी घटना उघडकीस आल्यानंतर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
सुशील कुंबलवार यांनी नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे समजू शकले नाही.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी येऊन चौकशी केली.

 

 

Web Title :- Police Committed Suicide in Chandrapur | chandrapur policeman committed suicide by hanging himself in his residence

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Attack On Sandeep Deshpande | देशपांडेवरील हल्ल्याप्रकरणी आदित्य ठाकरे, संजय राऊतांची चौकशी करा, मनसे नेत्याची पोलिसांकडे मागणी; राजकीय वर्तुळात खळबळ

MNS Sandeep Deshpande | मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर शिवाजी पार्कमध्ये हल्ला; रॉड आणि स्टम्पने केली मारहाण

Pune Crime News | ‘चोरटे’ही ‘रंगले’ कसबा निवडणुकीच्या रणधुमाळीत; जबरी चोरी, घरफोडी, वाहनचोरीच्या गुन्ह्यात घट