Police Crime News | पोलिसांकडून सराईत गुन्हेगाराचा वाढदिवस साजरा (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ( policenama online)  – Police Crime News| एकीकडे मुंबईत गुन्हेगारी वाढत असताना, दुसरीकडे मुंबई पोलीस (Mumbai Police) दुसरीकडे सराईत गुन्हेगारांचा वाढदिवस साजरा करताना दिसत आहेत. यामुळे मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) प्रतिमेला डाग लागला आहे. c(Jogeshwari) पूर्वेतील एमएमआरडीए कॉलनीतील सराईत गुन्हेगाराच्या (Police Crime News) राहत्या घरी गेल्या आठवड्यात वाढदिवस साजरा करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे.

भाजपचा ठाकरे सरकारवर निशाणा

भाजपचे नेते कीरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी हा व्हिडिओ फेसबुकवर शेअर करत ठाकरे सरकारवर (Thackeray government) निशाणा साधला आहे. ठाकरे सरकारचा राज्यात गुन्हेगाराचा वाढदिवस जोगेश्वरी पोलीस ठाण्यात (Jogeshwari Police Station) साजरा केला जातो. क्राईम ब्रँच वसुलीचे काम करतात, मुंबई पोलीस मनसुख हीरण चा हत्येची सुपारी घेते, गृहमंत्री आणि पोलीस आयुक्त एकमेकांवर हप्ता घेण्याचा आरोप करतात… सचिन वाझे महिन्याला 100 कोटीची वसुली आणि वाटप करतात, अशा शब्दांत त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

पोलिसांकडूनच कोरोना नियमांचे उल्लंघन

मुंबईत कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने राज्य सरकारने कोरोनाचे वेगवेगळे निर्बंध घातले आहेत. त्या नियमांची अंमलबजावणी करण्याचे काम पोलिसांचे आहे. असे असताना जोगेश्वरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र नेर्लेकर (Senior Police Inspector Mahendra Nerlekar) हे नियमांचे उल्लंघन करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. एकीकडे सामान्य नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारला जात असताना ज्यांच्यावर नियमांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आहे. तेच पोलीस नियम धाब्यावर बसवत गर्दी करुन सराईत गुन्हेगाराचा वाढदिवस साजरा करत असल्याचे दिसून येत आहे.

जामीनावर असलेल्या आरोपीचा वाढदिवस साजरा

जोगेश्वरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र नेर्लेकर हे सराईत गुन्हेगार आणि सध्या जामीनावर असलेला आरोपी दानिश इष्टीखार सय्यद याच्यासोबत केक कापताना व्हिडिओमध्ये दिसत आहेत. आरोपी सय्यद याच्यावर गोरेगाव पोलीस ठाण्यात (Goregaon Police Station) भारतीय दंड संहिता कलम 307 खुनाचा प्रयत्न करणे, कलम 148 प्राणघातक हत्यारासह दंगा करणे, कलम 324 घातक हत्यारांनी किंवा साधनांनी इच्छापूर्वक दुखापत पोहचवणे, कलम 504 शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान करणे अशा विविध प्रकारचे गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत.
याशिवाय जोगेश्वरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वजनिक ठिकाणी तलवार घेऊन फिरणे अशा गंभीर प्रकाराची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल आहे.

पोलीस निरीक्षकांवर कारवाईची मागणी

वरिष्ठ पोलिसांसोबत संगनमत असल्याने गुन्हेगारांचा आत्मविश्वास वाढत असल्याचे अनेकवेळा समोर आले आहे.
जोगेश्वरी पोलिसांचा प्रताप समोर आल्यानंतर मुंबई पोलिसांच्या प्रतिमेला डाग लागत असून प्रतिमा मलिन होत आहे.
अशा काही पोलिसांमुळे पोलीस दलाची मान खालावत आहे.
अशा पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी होत आहेत. यावर वरिष्ठ अधिकारी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

web title : police crime news | jogeshwari police celebrated the birthday of a criminal in mumbai

Pregnancy Bible | करीना कपूर-खान विरोधात बीडमध्ये पोलिसांत तक्रार दाखल