खबर्‍यामुळं चिंचवडमध्ये ‘गुढ’ उकललं, ४७ तोळे सोन्यासह १३ लाख ८२ हजारांच्या ऐवज जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – चिंचवड पोलिसांच्या खबऱ्यामुळे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराकडून मोठा गुन्हा उघडकीस आला. एक दिवसापूर्वी ५० तोळे सोन्या-चांदिचे दागिने आणि रोख रक्कम चोरणाऱ्या तिघांना अटक करुन ४७ तोळे सोने आणि रोख असा एकूण १३ लाख ८२ हजारांच्या ऐवज जप्त केला आहे.

तडीपार सराईत चंद्या उर्फ चंद्रकांत अनंत माने (२६, रा. मोरया हौसिंग सोसायटी, चिंचवड), त्याचा भाऊ बिल्डर उर्फ शशिकांत अनंत माने (२२, पाणी फिल्टर स्टेशनसमोर, पत्राशेड लिंकरोड, चिंचवड), मित्र कम्या उर्फ कमलेश दिलीप कसबे (२२, रा. पाणी फिल्टर स्टेशनसमोर, पत्राशेड लिंकरोड, चिंचवड) या तीन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे.

अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार सोमवारी (दि.२९ जुलै) लिंक रोड चिंचवड येथील हर्षदा सोसायटीतील घरातून ५० तोळे सोने-चांदिचे दागिने आणि रोख चोरट्यांनी चोरुन नेली होती. या गुन्ह्याचा तपास करत असताना तपास पथकातील पोलीस नाईक सुधाकर अवताडे यांना त्यांच्या खबऱ्याकडून माहिती मिळाली कि, चिंचवड येथील तडीपार सराईत घरफोड्या करणारा चोरटा चंद्या हा वाल्हेकरवाडी येथील राजयोग पेट्रोल पंपाजवळ फिरत आहे.

पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त सुधीर हिरेमठ, परीमंडळ एकच्या पोलीस उप आयुक्त स्मिता पाटील, सहाय्यक पोलिस आयुक्त रामचंद्र जाधव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक भिमराव शिंगाडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वजीत खुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित जाधव, पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे, पोलिस हवालदार दत्तात्रय गायकवाड, पांडुरंग जगताप, पोलिस नाईक सुधाकर अवताडे, स्वप्निल शेलार, ऋषीकेश पाटील, पोलिस शिपाई नितीन राठोड, गोविंद डोके, अमोल माने, सचिन वर्णेकर, पंकज भदाणे यांच्या पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

ताब्यात घेऊन त्याच्याकडे चिंचवड येथील घरफोडी बाबत तपास केला असता त्याने त्याचा भाऊ बिल्डर उर्फ शशिकांत आणि मित्र कम्या उर्फ कमलेश सोबत मिळून हर्षदा सोसायटीतील घरफोडी आणि अंबीका दुकानात चोरी केल्याचे कबुल केले. यावर पोलिसांनी त्याचा भाऊ बिल्डर आणि मित्र कम्या या दोघांना लिंक रोड पत्राशेड समोरील मोकळ्या इमारतीतून अटक केली. तसेच त्यांच्याकडून ४७ तोळे सोने, ४६० रुपयांची नाणी असा एकूण १३ लाख ८२ हजार ३७३ रुपयांचा ऐवज जप्त केला.

आरोग्यविषयक वृत्त –