मंत्रालयात कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन 

मंत्रालयात एका सरकारी कर्मचाऱ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अन्य कर्मचाऱ्यांनी वेळीच धाव घेतल्याने या कर्मचाऱ्याचे प्राण वाचले. सक्तीने सेवानिवृत्त केल्यामुळे आपल्यावर अन्याय झाल्याचा आरोप करून उद्योग, ऊर्जा व कामगार विभागातील शिपाई दिलीप सोनवणे यांनी मंत्रालयातील उद्योग व कामगार विभागाचे प्रधान सचिव राजेश कुमार यांच्या दालनासमोर विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तथापि, त्याठिकाणच्या अन्य कर्मचाऱ्यांनी सोनवणे यांना रोखले, तसेच त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9b0669cd-cea3-11e8-900f-ef3c5942d120′]

आपल्यावर अन्याय झाल्याची सोनवणे यांची भावना होती. ते आपल्या कुटुंबीयांसह मंत्रालयात आले होते. त्यांनी अधिकाऱ्यांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. आपल्याला बढती मिळणार होती, पण आकसाने आपणास सक्तीने सेवानिवृत्ती देण्याचा प्रयत्न झाला, असा आरोप करीत सोनवणे यांनी त्यांच्याजवळच्या लहान बाटलीमधून फिनाइलसदृश रसायन पिण्याचा प्रयत्न केला. तथापि त्यांना वेळीच त्याठिकाणच्या अन्य कर्मचाऱ्यांनी रोखले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

#MeToo : तुमचे सत्य लवकरच समोर येईल : हेअर स्टाईलिस्टचा बिग बींना इशारा

 

तक्रार करायला आलेल्या महिलेचा पोलिसाने केला विनयभंग

पिंपरी-चिंचवड : पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्या ३६ वर्षीय विवाहित महिलेचा पोलिसानेच विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी-चिंचवडमध्ये घडला आहे. हे कृत्य करणारा पोलीस हा सहायक उपनिरीक्षक या पदावर कार्यरत आहे. राजेंद्र पालवे असं त्या पोलिसाचे नाव असून तो साने चौकीत कार्यरत आहे.

[amazon_link asins=’B01F7AX9ZA,B072XP1QB7′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5df5573d-cea7-11e8-91a7-d782f30edf02′]

पीडित महिला १० ऑक्टोबरला तिच्या पतीविरोधात तक्रार देण्यासाठी साने चौकीत आली होती. त्यावेळी राजेंद्र पालवे या पोलिसाने, मी आहे, तुम्ही घाबरू नका असा आधार देत, त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मध्यरात्री दोन वाजता या पोलिसाने पीडित महिलेच्या मुलाच्या फोनवर फोन केला, आणि आईकडे फोन दे असे त्याला सांगितले. मुलाने पीडित महिलेकडे फोन दिल्यावर पोलिसाने त्यांची विचारपूस करत सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला आणि थेट आय लव्ह यू म्हणाला. दुसऱ्यादिवशी त्याच्याविरोधात पीडित महिलेने चिखली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. पिंपरी चिंचवड आयुक्तालयात दहा तारखेला चिखली पोलीस स्टेशनची स्थापना झाली. त्यानंतर हा तिसरा गुन्हा दाखल झाला आहे.