पोलिसांनी सांगितली हैदराबाद ‘गँगरेप’च्या आरोपींच्या ‘एन्काऊंटर’ची संपुर्ण ‘स्टोरी’, जाणून घ्या ‘या’ 5 महत्वाच्या गोष्टी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था हैदराबाद येथील (Hyderabad gangrape and murder case) बलात्कार आणि खून प्रकरणातील दोन आरोपींनी सकाळी पोलिसांच्या हातून शस्त्रे हिसकावून पोलिसांवर गोळीबार केला, त्यानंतर पोलिसांनी देखील त्यांच्यावर गोळीबार केला. सायबराबादचे पोलिस आयुक्त सी.व्ही. सज्जनार म्हणाले की, मोहम्मद आरिफ या आरोपींपैकी एकाने प्रथम गोळी झाडली होती. घटनास्थळी त्यांच्यासमवेत तेथे गेलेल्या पोलिसांच्या पथकावरही वीट व दगडांनी हल्ला करण्यात आला. ते म्हणाले की, पकडलेली शस्त्रे ‘अनलॉक’ (गोळीबार करण्यास तयार) स्थितीत होती.

सज्जनार यांच्या पत्रकार परिषदेतल्या पाच मोठ्या गोष्टी

१) सायबराबादचे पोलिस आयुक्त सी.व्ही. सज्जनार म्हणाले, चारही आरोपी दहा दिवस पोलिस कोठडीत होते. आम्ही या सर्वांची चौकशी केली. जेव्हा त्याने गुन्ह्याची कबुली दिली, तेव्हा आम्ही त्यांना घटनास्थळी घेऊन गेलो होतो. घटनास्थळी पोहोचलो तेव्हा आरोपींनी आमच्यावर हल्ला केला व त्यांनी आमच्यावर दगडफेक करुन आमच्या बंदुका हिसकावल्या. त्यामुळे आम्हाला प्रतिउत्तर करावे लागले. आरोपी अजूनही तेथे शस्त्रांसासमवेत पडून आहेत.

२) ते म्हणाले, ‘कर्नाटकातील इतरही अनेक प्रकरणांमध्ये आरोपींचा सहभाग असल्याचा आम्हाला संशय आहे, चौकशी सुरू आहे.’ शुक्रवारी सकाळी ५.४५ ते ६.१५ दरम्यान या चकमकी झाल्या, या आरोपीचे नावही इतर अनेक खटल्यांशी संबंधित आहे, त्याचा तपास सुरू असल्याचे देखील पोलिस आयुक्तांनी सांगितले.

३) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या वेळी आरोपी मोहम्मद आरिफ आणि केशवुलू यांनी हत्यार हिसकावून घेतले. गोळीबार करत असताना ते पळून जाण्याचा प्रयत्न करीत होते. या प्रकरणाबाबतचे आपल्याकडे ठोस पुरावे असल्याचा दावा देखील पोलिस आयुक्त सीव्ही सज्जनार यांनी केला.

४) राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने या प्रकरणाची दखल घेतल्याच्या प्रश्नावर सीव्ही सज्जनार म्हणाले, ‘जो कोणी दखल घेईल मग त्यात राज्य सरकार असो की मग एनएचआरसी असो अशा सर्वांना आम्ही उत्तर देऊ. मी फक्त असे म्हणू शकतो की कायद्याने आपले कर्तव्य बजावले आहे.

५) सज्जनार म्हणाले, ‘चकमकीच्या वेळी आरोपींसह सुमारे दहा पोलिस होते. आम्ही घटनास्थळी पीडितेचा सेलफोन जमा करण्यात आला आहे. आम्ही आरोपींकडील दोन शस्त्र देखील जप्त केले आहेत. आरोपींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी स्थानिक शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. यानंतर मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना स्वाधीन करण्यात येतील.

Visit : Policenama.com