Blenders pride ची दारू बॉटल आणि 40 हजार रुपयांची लाच मागितल्यानंतर 20 हजार रुपयांची लाच घेताना पोलीस अधिकाऱ्यास खासगी इसमासह अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Blenders pride ची दारू बॉटल आणि 40 हजार रुपयांची लाच मागितल्यानंतर 20 हजार रुपयांची लाच घेताना पोलीस अधिकाऱ्यास खासगी इसमासह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे.

भारत शिवाजी ढेंबरे (वय 39) असे पकडण्यात आलेल्या उपनिरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी बृहन्मुंबई विभागात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची कंपनी असून, त्यांच्या कंपनीला बृहन्मुंबई महापालिकेकडून क्लिनअप मार्शलचे कंत्राट मिळालेले आहे. त्यांच्या कंपनीकडून विनामास्क असलेले व्यक्तींवर कारवाई केली जाते.

यावेळी त्यांनी एका व्यक्तीवर कारवाई केली होती. त्या व्यक्तीला कारवाईचा राग आला होता. त्याने व नातेवाईक यांनी यातील तक्रारदार याच्याशी वाद घातला. तसेच, त्यातून त्या व्यक्तीला चांगलाच मार लागला होता. त्यामुळे त्यांनी चारकोप पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्याचा तपास लोकसेवक उपनिरीक्षक ढेंबरे यांच्याकडे होता. दरम्यान त्यांनी यातील तक्रारदार यांचा मोबाईल व DVR जप्त केला होता. तक्रारदार हे जामीन मिळल्यानंतर पोलीस ठाण्यात गेले. तसेच जप्त मोबाईल, DVR मिळवण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळी लोकसेवक उपनिरीक्षक ढेंबरे यांच्या ओळखीचा खासगी व्यक्तीकडे मोबाईल व DVR बाबत माहिती घेतली. त्याने मोबाईल देण्यासाठी 20 हजार आणि वडिलांचे नाव न घेण्यासाठी 20 हजार असे 40 हजार तसेच एक ब्लेंडेर प्राईड दारूच्या बाटलीची लाच मागितली. तक्रारदार यांनी याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंद केली होती. याची पडताळणी केली. त्यात लाच मागितल्याचे निष्प्रन झाले. आज कारवाई करताना तडजोडीअंती 20 हजार रुपयांची लाच घेताना उपनिरीक्षक ढेंबरे यांना रंगेहात पकडले.