धक्‍कादायक ! पोलीस ठाण्यातच पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन – चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा पोलीस ठाण्यातच पोलीस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली असून पोलीस कर्मचाऱ्याने कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे अद्याप समजू शकले नाही. ही घटना आज (शनिवार) सकाळी साडेनऊच्या सुमारास उघडकीस आली.

सुरेश भांबुळे (वय-५०) असे आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव होते. त्यांनी वरोरा पोलीस ठाण्यातील तपासी पथकाच्या (DB Room) खोलीत गळफास लावून आत्महत्या केली. सकाळी तपास पथकाली कर्मचारी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश भांबुळे हे काही दिवसांपासून रजेवर होते. काल रात्री अकराच्या सुमारास गुन्हे शोध पथकातील कर्मचारी निघून गेले. त्यानंतर सुरेश हे खोलीत आले. त्यांनी खोलीमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. आज सकाळी साडे नऊच्या सुमारास तपास पथकातील कर्मचाऱ्यांनी खोलीचा दरवाजा उघडला असता. सुरेश भांबुळे हे लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहेत.

‘बेबी डॉल’ सनी लिओनीने बॉयफ्रेंडसोबत केले सलग ६ ‘पॉर्न’ सिनेमे

Video : ‘या’ अभिनेत्रीने कॉपी केला दीपिका पादुकोणचा ‘लुक’

कांबळे दुहेरी हत्याकांडातील तपासात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करा

कडुबाई खरात यांच्यासह अनेक मातंग बांधव घेणार धम्मदीक्षा

व्यायामाचा आनंद वाढविण्यासाठी ही आहे ‘बेस्ट आयडिया’

कोवळे पिंपळपान हृदयातील ब्लॉकेजेसाठी वरदान