ब्रेकिंग : 4 हजाराची लाच घेताना पोलिस कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – ट्रॅक्टरवर कारवाई न केल्याच्या मोबदल्यात 10 हजार रुपयांची लाच मागून चार हजार रुपये स्वीकारताना पोलीस कर्मचाऱ्यास रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राहाता पोलीस ठाण्यात आज सायंकाळी ही कारवाई केली.

बाळासाहेब गोपीनाथ बाचकर (वय 32, पोलीस नाईक ब. नं. 2148, राहाता पोलीस स्टेशन, राहता.
रा.सद्गुरू अपार्टमेंट, तिसरा मजला, राहाता, अ’नगर, वर्ग -3) हे अटक केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, तक्रारदार यांचे ट्रॅक्टर वर कारवाई न केलेचा मोबदला म्हणून आज पंचासमक्ष 10 हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती 4 हजार रुपये स्विकारले. पोलीस उपअधीक्षक गणेश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दीपक करांडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

आरोग्यविषयक वृत्त –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like