‘छमछम’ सुरूच ! ‘डान्स बार’वर पोलिसांचा छापा, अश्लील नृत्य करताना आढळल्या बारबाला, 22 अटकेत

मालाड : पोलीसनामा ऑनलाइन – मालाड येथील एका जुन्या प्रसिद्ध मंदिराजवळ सुरु असलेल्या डान्स बारवर पोलिसांनी छापा टाकून 22 जणांना अटक केली आहे. ही कारवाई शनिवारी (दि.2) पहाटेच्या सुमारास मालाड येथील पोलादर रोडवरील लक्ष्मी नारायण मॉलमध्ये असलेल्या काका बार आणि रेस्टॉरंटमध्ये करण्यात आली. यावेळी 93 हजार 930 रुपयांचा रोख रक्कमेसह म्युझीक सिस्टीम जप्त करण्यात आली.

पोलीस उपायुक्त शिवदीप लांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मी नारायण मॉलमध्ये असलेल्या काका बार आणि रेस्टॉरंटमध्ये डान्स बार सुरु असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी हॉटेलमध्ये छापा टाकला असता या ठिकाणी डान्स बार सुरु असल्याचे दिसून आले. पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी दहा महिला डान्स करताना आढळून आल्या.

पोलिसांनी त्यांची सुटका केली आहे. या कारवाई दरम्यान 22 जणांना अटक करण्यात आली असून यामध्ये 14 ग्राहक, 5 कर्मचारी आणि वेटर तसेच व्यवस्थापक, कॅशिअर यांचा समावेश आहे. पोलिसांनी 93 हजार 930 रुपयांची रोख रक्कम आणि म्युझीक सिस्टीम जप्त केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींवर दिंडोशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Visit : Policenama.com