Police Suspended | पुण्यात महिलेला पोलिसाकडून मारहाण; पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा अन् निलंबनाची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दुकानासमोर गाडी लावण्यास मनाई केल्याच्या रागातून एका बांगडी विक्रेत्या महिलेला पोलीस (Pune Police) कर्मचाऱ्याने मारहाण (Beating) केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा (FIR) दाखल करुन त्याच्यावर निलंबनाची (Police Suspended) कारवाई करण्यात आली आहे. हा प्रकार मंडई पोलीस चौकीच्या (Mandai Police Chowki) शेजारी 19 ऑक्टोबर रोजी घडला होता. याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishram Bagh Police Station) राहुल शिंगे (Rahul Singhe) यांच्यावर गुन्हा दाखल करुन निलंबनाची (Police Suspended) कारवाई करण्यात आली आहे.

याप्रकरणी कांचन दिपक दोडे Kanchan Deepak Dode (वय-50) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दरम्यान, याप्रकरणी भाजपच्या (BJP) पदाधिकाऱ्यांनी संबंधित महिलेस मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचारी (Police Personnel) राहूल शिंगे याच्यावर कायदेशीर कारवाई (Legal Action) करण्याची मागणी करत पाठपुरावा केला. अखेर शिंगे याच्यावर गुन्हा दाखल करुन त्याचे निलंबन केल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. निलंबित पोलीस (Police Suspended) कर्मचारी राहूल शिंगे हा खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) कार्यरत आहे.

कांचन दोडे यांचे मंडई पोलीस चौकी जवळ बांगड्याचे दुकान आहे.19 ऑक्टोबर रोजी दुपारी शिंगे हे त्यांच्या
दुचाकीवरुन आले. त्यांनी दुकानासमोरील पाण्याच्या टाकीजवळ त्यांची दुचाकी लावली. त्यावेळी कांचन दोडे यांनी
या ठिकाणी दुचाकी पार्क करु नका असे शिंगे यांना सांगितले. याचा राग आल्याने शिंगे यांनी दोडे यांना शिवीगाळ
करुन त्यांच्या तोंडावर डोळ्याजवळ हाताने ठोसे मारुन जखमी केले.

याप्रकरणी दोडे या पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी गेल्या असता पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिला.
मात्र भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh), प्रमोद कोंढारे (Pramod Kondhare),
पुष्कराज तुळजापुरकर (Pushkaraj Tuljapurkar) यांनी या प्रकरणाची दखल घेत संबंधीत पोलीस कर्मचाऱ्यावर
गुन्हा दाखल करुन निलंबीत करण्याची मागणी केली. तसेच या प्रकरणाचा पाठपुरावा केला.
यानंतर आरोपी राहूल शिंगे याच्यावर गुन्हा दाखल करुन निलंबनाची कारवाई करण्यात आली.

Web Title :- Police Suspended | A woman was beaten up by the police in a mandai in Pune, a case was registered against the policeman and suspension action was taken

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Janhvi Kapoor | जान्हवी कपूरच्या वडिलांनी शेअर केले तिचे बेडरुम सिक्रेट, म्हणाले – ‘मी तिच्या खोलीत जातो तेव्हा…’

Maharashtra Rojgar Melava 2022 | 75 हजार जागांच्या भरतीला सुरुवात, फडणवीसांनी केलं ‘हे’ आवाहन (व्हिडिओ)

Maharashtra Revenue And Forest Department Officers Transfer | अपर जिल्हाधिकारी संवर्गातील 8 अधिकार्‍यांच्या प्रतिनियुक्तीने नियुक्त्या

Jayant Patil | तरुणांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात शिंदे सरकारला पूर्णपणे अपयश आले- जयंत पाटील