व्यापाऱ्यांना धमकावणाऱ्या व खंडणी मागणाऱ्यांवर पोलीस कठोर कारवाई करणार; पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाच्या निवेदनानंतर पोलिसांकडून आश्वासन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आता दुकाने उघडली आहेत. व्यापार सुरु झाला आहे. गेल्या सव्वा वर्षाच्या कोरोना कालखंडात तीनवेळा झालेला लॉकडाऊन आणि बाजारात असलेली मंदी सदृश्य परिस्थिती यामुळे व्यापारी (Traders) वर्गाची आर्थिक परिस्थिती हालाखिची झाली आहेत. त्यातच अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांना माथाडी कामगार असल्याच्या नावाखाली त्रास देऊन पैसे उकळण्याचे प्रकार होत आहेत. यासंबंधी आज खंडणी विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांची पुणे जिल्हा रिटेल व्यापारी (Traders) संघाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी त्यांनी व्यापाऱ्यांना (Traders) पैसे मागून कोणी त्रास दिल्यास त्यासंदर्भात पोलीस तत्काळ कारवाई करतील असे आश्वासन दिले.

आयटी प्रोफेशनल्ससाठी मोठी बातमी ! नव्या नोकरीत 40 % वेतनवाढीचा अंदाज

पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे, महिला शाखेच्या कार्याध्यक्षा शिल्पा भोसले, सदस्य भंवर चौधरी आदींनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांना निवेदन देऊन व्यापाऱ्यांना होत असलेल्या त्रासाबद्दल माहिती दिली.
याप्रसंगी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील उपस्थित होते.

माथाडी कामगार असल्याचे सांगून व्यापाऱ्यांकडून पैसे उकळण्याचे प्रकार सऱ्हास होत आहेत.
गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांकडून व्यापाऱ्यांना मारहाण झाल्याचे प्रकार घडत आहेत.
आधीच कोरोना व लॉकडाऊनमुळे हैराण झालेला व्यापारी आता या त्रासामुळे त्रस्त झाला आहे.
हा सर्व प्रकार पोलिसांच्या नजरेस आणून देण्याचे काम पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाने केले आहे.
पोलिसांकडूनही अत्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालजी पांढरे व हेमंत पाटील यांनी व्यापाऱ्यांना अशा प्रकारे त्रास देणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असे सांगितल्याची माहिती अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी दिली.

शहरातील व्यापाऱ्यांनी त्यांना जर अशा प्रकारे कोणी धमकावल्यास,
अवैधरित्या पैशांची मागणी केल्यास तत्काळ नजीकच्या पोलीस चौकीत जाऊन तक्रार द्यावी.
पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाच्या कार्यालयात संपर्क साधावा.
व्यापाऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघ सदैव तत्पर आहे,
असे अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी सांगितले.

Also Read This : 

 

खासगी बस अन् टेम्पोचा भीषण अपघात; 17 जणांचा मृत्यू, चौघे गंभीर जखमी

 

Health News : जांभळाचे ‘या’ वेळी करावे सेवन, ‘हे’ 5 फायदे जाणून व्हाल हैराण