Pooja Chavan Suicide Case : कशा बाहेर आल्या Audio Clips ? समोर आली धक्कादायक माहिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी भाजपनं आरोप केला होता की, मंत्री संजय राठोड यांच्या सोबत असलेल्या प्रेमसंबंधातून तिनं हे पाऊल उचललं आहे. या प्रकरणी भाजपकडून पुरावा म्हणून काही ऑडिओ क्लीप्सही देण्यात आल्या आहेत. यातील आवाज कोणाचा आहे याचा तपास सध्या सुरू आहे. या प्रकरणी अरुण राठोड या तरूणाचं नावही प्रखरतेनं पुढं येताना दिसत आहे. या ऑडिओ क्लीप्स सोशल मीडियावर देखील व्हायरल झाल्या आहेत. या क्लीप्स बाहेर कशा आल्या याबाबत विचारणा केली जात आहे. याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ज्या दिवशी पूजाच्या आत्महत्येची घटना घडली त्यावेळीच भाजपच्या एका स्थानिक कार्यकर्त्यानं अरुण राठोडकडून या ऑडिओ क्लीप्स काढून घेतल्याचं समोर येत आहे. इतकंच नाही तर त्यावेळी त्यांच्या फोटो आयडीचे फोटो काढून घेतल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणी आता दबाव आणखी वाढताना दिसत आहे. इतकंच नाही तर ज्या कार्यकर्त्यानं या क्लीप्स अरुण राठोडकडून काढून घेतल्या तो देखील आता माध्यमांसमोर येण्याचं टाळत आहे. यामुळं आता पूजा चव्हाण मृ्त्यूचं गूढ अधिकच वाढल्याचं दिसत आहे.

नुकताच पूजाचा पोस्टमॉर्टेम रिपोर्टही समोर आला आहे. याता तिच्या डोक्यावर आणि मणक्याला मार लागल्याचं समोर आलं आहे. पोलिसांना चौकशीदरम्यान तिच्या घरात 4 दारूच्या बाटल्याही आढळून आल्या आहेत. काहींचं असंही म्हणणं आहे की, पूजानं मित्र मैत्रिणींसोबत पार्टी केल्यानंतर पाय घसरून किंवा चक्कर येऊन ती चक्कर येऊन खाली पडली. परंतु याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. भाजपनं मात्र या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली आहे. सध्या पोलीस समोर आलेल्या माहितीच्या आधारावर तपास करत आहेत.