एकीकडे ९१ टक्के श्रीमंत तर एकीकडे ‘हे’ आहेत लोकसभेतील सर्वात गरीब खासदार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाचा काळ शपथविधी पार पडला आणि खातेवाटप देखील झाले. नरेंद्र मोदींच्या या मंत्रिमंडळात एकूण ५८ मंत्र्यांपैकी ५१ खासदार हे कोट्याधीश आहेत तर संसदेत निवडून आलेल्या ५४२ खासदारांपैकी काही खासदार असे आहेत ज्यांच्याकडे स्वतःचे घरीदेखील नाही तर काहींकडे गाडी नाही.

दरम्यान, नवनिर्वाचित खासदारांमध्ये कोणाकडे किती संपत्ती आहे याची आकडेवारी समोर आली आहे. या सगळ्यात लोकसभेत निवडून गेलेल्या ५४२ खासदारांपैकी ६ खासदार असे आहेत ज्यांच्याकडे स्थावर मालमत्ता नाही. यातील १० खासदार असे आहेत ज्यांच्याकडे बाकीच्या खासदारांच्या तुलनेत फारच कमी संपत्ती आहे.

कोण आहेत हे खासदार

१)चंद्राणी मुर्मू –

बीजेडीच्या या खासदाराकडे साडेतीन लाखांची रोख रक्कम आहे. ओडिशाच्या क्योंझर मतदारसंघातून निवडून आलेल्या देशातील सर्वात तरुण खासदार चंद्राणी मुर्मू या आहेत. त्या सध्या २५ वर्ष वयाच्या आहेत.

२)इंद्र हांग सुब्बा –

सिक्कीममधून एसकेएम या पक्षाकडून खासदारपदावर निवडून आलेले इंद्र हांग सुब्बा यांच्याकडे जवळपास पाच लाखांची रोख रक्कम आहे. त्यांच्याकडे स्थावर नाही.

३)मो. फैजल पीपी –

लक्षद्वीपमधून लोकसभेवर निवडून गेलेले राष्ट्रवादीचे खासदार मो. फैजल पीपी यांच्याकडे दहा लाखांची रोख रक्कम आहे. या पाच खासदारांप्रमाणे यांच्याकडे देखील स्थावर मालमत्ता नाही.

४)प्रतिमा भौमिक –

त्रिपुरातून पश्चिम त्रिपुरा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या खासदार प्रतिमा भौमिक यांच्याकडे अडीच लाख रोख आहेत.

५)सेरिंग नामग्याल –

जम्मू-कश्मीरच्या लडाख मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले खासदार सेरिंग नामग्याल यांच्याकडे सात लाखांची रोख रक्कम आहे.
६)राम्या हरिदास –

केरळच्या अथापूर मतदारसंघातून निवडून आलेले काँग्रेसचे खासदार राम्या हरिदास यांच्याकडे दीड लाखांची रोख रक्कम आणि १० लाखांची स्थावर मालमत्ता आहे .

७)गोड्डेटी मधावी –

आंध्र प्रदेशमधील अरकू मतदारसंघात वायएसआर काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या खासदार गोड्डेटी मधावी यांच्याकडे दीड लाख रुपयांची रोख रक्कम आहे, परंतु त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची अचल संपत्ती नाही.

८)साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर –

भोपाळमध्ये भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्याकडे साडेचार लाखांची रोख रक्कम आहे. त्यांच्याकडे कोणतीही स्थावर मालमत्ता नाही.

९)महंत बालक नाथ –

खासदार महंत बालक नाथ यांच्याकडे ३. ५२ लाखांची रोख रक्कम आहे. राजस्थानच्या अलवर मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडून आले आहेत.

१०)प्रमिला बिसोई –

ओडिषाच्या अस्का मतदारसंघातून बीजेडीकडून निवडून आलेल्या खासदार प्रमिला बिसोई यांच्याकडे ३. ७३ लाखांची रोख रक्कम आहे, तर ३. ६० लाखांची स्थावर मालमत्ता आहे.