Pornography Case | पोर्नोग्राफी प्रकरणात क्राइम ब्रँचला आणखी एक यश, राज कुंद्रानंतर पकडला गेला ‘हा’ व्यक्ती

मुंबई : Pornography Case प्रकरणात मुंबई क्राईम ब्रँचला आणखी एक यश मिळाले आहे. अभिनेत्री Shilpa Shetty चा पती आणि बिझनेसमन Raj Kundra च्या अटकेनंतर जवळपास 10 तासानंतर क्राईम ब्रँचने नेरुळ परिसरातून रयान थारप नावाच्या एका व्यक्तीला अटक केली आहे. या केसमध्ये (Pornography Case) आतापर्यंत राजसह 11 लोकांना अटक झाली आहे.

कुंद्राविरूद्ध फेब्रुवारी 2021 मध्ये दाखल केली होती तक्रार

काल रात्री Raj Kundra ला क्राईम ब्रँचने अटक केली. राजवर Porn Film बनवणे आणि ते काही अ‍ॅपवर दाखवल्याचा आरोप आहे. राज कुंद्राला मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलमध्ये मोठ्या चौकशी केल्यानंतर अटक करण्यात आली. फेब्रुवारी 2021 मध्ये राज कुंद्राविरूद्ध तक्रार दाखल करण्यात आली होती.

या संपूर्ण प्रकरणात मास्टर माईंड आहे राज कुंद्रा

मुंबई क्राईम ब्रँचने म्हटले की, राज कुंद्रा या संपूर्ण प्रकरणात मास्टर माईंड आहे. राज कुंद्रा आणि
त्याच्या ब्रिटनमधील भावाने केनरिन नावाची कंपनी स्थापन केली आहे. ज्यावर पोर्न चित्रपट दाखवले
जातात. चित्रपटाचे व्हिडिओ भारतात शूट केले जात होते आणि व्ही ट्रान्सफरद्वारे ते परदेशात
पाठवले जात होते.

मुंबई क्राईम ब्रँचची टीम राज कुंद्राला मंगळवारी कोर्टात हजर करेल. पोलिसांचे म्हणणे आहे की
त्यांच्याकडे राज कुंद्रा विरुद्ध पुरेसे पुरावे आहेत. पोलिसांनी व्हिडिओ अपलोड करणार्‍या उमेश
कामथला सुद्धा अटक केली आहे.

हे देखील वाचा

Ashadi Ekadashi | आषाढी एकादशीनिमीत्त एन.ई.एम.एस. पूर्वप्राथमिक शाळेमध्ये ऑनलाईन पालखी सोहळ्याचे आयोजन

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  pornography case crime branch arrested ryan tharp  was arrested yesterday in this case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update