Porsche Car Accident Pune | पोर्शे कार अपघातप्रकरणी प्रकाश आंबेडकरांचे पुणे पोलीस आणि गृहमंत्र्यांना 6 प्रश्न, म्हणाले आमचं हृदय तिळ तिळ तुटतंय, पोलीस मृतांच्या नात्याबद्दलंच…

मुंबई : Porsche Car Accident Pune | पुण्यातील कल्याणीनगरमध्ये पोर्शे कार अपघातानंतर जनता आणि माध्यमांनी आवाज उठवल्यानंतर सुरूवातीला चुकीच्या पद्धतीने काम करणारे पोलीस आणि इतर प्रशासकीय यंत्रणा कामाला लागल्या आहेत (Kalyani Nagar Pune Accident) . गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सुद्धा या प्रकरणात पुण्यात येऊन गेले. त्यांनी पोलिसांची बाजू प्रकर्षाने मांडली, तसेच योग्य कारवाईचे आश्वासन दिले. मात्र, या प्रकरणाचे तीव्र राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. आता वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी पुणे पोलीस (Pune Police) आणि फडणवीस यांना ६ प्रश्न विचारले आहेत.

वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणासंबंधी एक्सवर एक पोस्ट केली असून हे सहा प्रश्न विचारले आहेत. तसेच पुणेकरांचे आभारही मानले असून आम्ही सुद्धा पालक आहोत, या घटनेनंतर आमचा जीव तिळ तिळ तुटत असल्याच्या भावना आंबेडकर यांनी व्यक्त केल्या आहेत.

प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे की, येरवडा पोलीस स्टेशनमधील अधिकाऱ्यांनी अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टाचं नातं काय आहे यासंदर्भातील प्रश्न विचारण्यातच अधिक वेळ घालवला. आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या या दोघांना मद्यधुंदावस्थेत कार चालवणाऱ्या अल्पवयीन मुलाने उडवलं. दुसरीकडे या आरोपी मुलाला कथित स्वरुपात पिझ्झा आणि बर्गर देण्यात आलं.

या प्रकरणात प्रकाश आंबेडकरांनी ६ प्रश्न उपस्थित करताना म्हटले आहे की…

आपली यंत्रणा श्रीमंत लोकांना कशाप्रकारे झुकतं माप देते हे पाहा

१) अल्पवयीन मुलाला क्लबमध्ये मद्य कसं काय देण्यात आलं?

२) शोरुममध्ये नोंदणीकृत क्रमांकाशिवाय ही कार कशी काय दिली?

३) ही कार वाहतूक पोलिसांच्या नजरेतून कशी काय सुटली?

४) या मुलाला आधी जामीन कसा मंजूर झाला? त्याला अल्पवयीन म्हणून कोठडी का सुनावण्यात आली नाही?

५) आठ तासांनंतर अल्कोहोल चाचणी का करण्यात आली?

६) उपमुख्यमंत्री या प्रकरणात मरण पावलेल्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आले पुण्यात आले की बिल्डरच्या मुलाला सोडवण्यासाठी आले?

या पोस्टमध्ये आंबेडकर यांनी पुढे लिहिले आहे की, सर्वच स्तरातून आक्षेप घेण्यात आल्यानंतर यंत्रणा कामाला लागल्या. यंत्रणांना सध्या जे सुरु आहे ते योग्य वाटत असल्याने घडत नसून सर्वच स्तरातून आक्षेप नोंदवण्यात आल्याने घडतंय. सध्या यंत्रणा कामाला लागून या प्रकरणामध्ये जी काही कामगिरी केली जात आहे त्यासाठी केवळ पुण्यातील नागरिकांचे आभार मानले पाहिजे. (Porsche Car Accident Pune)

प्रकाश आंबेडकरांनी शेवटी लिहिले आहे की, अंजू आणि मी पालक आहोत.
आपल्या पाल्याला गमावण्यासारखं दु:ख नाही.
या दुर्घटनेत बळी पडलेल्या मुलांच्या पालकांसाठी आमचं हृदय तिळतिळ तुटत आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ujani Dam Backwater Boat Accident | उजनी जलाशय बोट दुर्घटनेतील बेपत्ता 6 पैकी 5 जणांचे मृतदेह सापडले, कुटुंबियांचा आक्रोश

Pune Crime Branch | पुणे : गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगाराला अटक, दोन पिस्टल व चार राऊंड जप्त