Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे कार अपघातप्रकरणी अग्रवाल यांचे घर, बार, अपघात स्थळाचे सर्व सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती, 100 फुटेजची तपासणी सुरू
पुणे : Porsche Car Accident Pune | पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणी जनसामान्यांचा रेटा वाढल्याने पोलिसांच्या तपासाला वेग आला आहे (Kalyani Nagar Accident). या प्रकरणाच्या अनुषंगाने रोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. या प्रकरणाचा तपास विमाननगर पोलिसांकडून (Viman Nagar Police) काढून पुणे क्राईम ब्रँचकडे वर्ग करण्यात आला आहे. गुन्हे शाखेने तपासात अग्रवाल यांचे घर, बार, घटनास्थळ येथील १०० पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) ताब्यात घेतले असून त्याची तपासणी सुरू केली आहे. या तपासणीतून बरेच काही बोहर येण्याची शक्यता आहे.
विशाल अग्रवाल (Vishal Agarwal,) यांच्या घरावर देखील गुन्हे शाखेने (Pune Crime Branch) छापेमारी केली होती. ही छापेमारी आणि सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून अग्रवाल कुटुंबियांची कुंडली बाहेर येण्याची शक्यता आहे. सध्या अपघात प्रकरणात अल्पवयीन आरोपी तसेच त्याचे बिल्डर असलेले वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल (Surendra Kumar Agarwal) यांना अटक करण्यात आली आहे.
सुरेंद्रकुमार अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांनी प्रकरणातील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असून त्यादृष्टीने पोलीस तपास करत आहेत. यासाठी सुरेंद्रकुमार अग्रवाल याला पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
सुरेंद्रकुमार अग्रवाल याचे छोटा राजनशी (Chhota Rajan) असलेले कनेक्शन या निमित्ताने पुन्हा समोर आल्याने प्रकरणाची व्याप्ती वाढत चालली आहे.
त्यातच दोघा बाप-बेट्यांनी त्यांच्या चालकाला डांबून ठेवून धमकी दिल्याने अग्रवाल यांचा पाय आणखी खोलात गेला आहे.
आता सीसीटीव्ही फुटेजमधून बरेच काही बाहेर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Ravindra Dhangekar On Ajit Pawar | पोर्शे कार अपघातावरून धंगेकरांचा अजितदादांवर निशाणा,
”त्यांची भाषा सैल झालीय, फडणवीसांनी हातपाय बांधून खुर्चीत ठेवलंय” (Video)