आता ‘या’ ठिकाणाहून राज्यातल्या-राज्यात करता येणार ‘प्रवास’, सरकारची नवी नियमावली जाहीर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात अडकलेल्या परराज्यातील मजूर, कामगार आणि विद्यार्थ्यांना परत त्यांच्या राज्यात पाठवण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. राज्याबाहेर कसं जाता येईल, याबाबत चाचपणी सुरु झाली आहे. तर दुसरीकडे राज्यातल्या राज्यात प्रवास करण्यासाठी राज्य सरकारने नवी निमयमावली जाहीर केली आहे.

जिल्हाधिकारी किंवा महापालिका आयुक्तांनी ठरवलेल्या प्रतिबंधित क्षेत्रात कोणत्याही प्रकारची लोकांची वाहतूक होणार नाही. या झोनमध्ये कोणी आत येणार नाही किंवा कोणी बाहेर जाणार नाही, असं नव्या नियमावलीत म्हटलं आहे.

डॉक्टरचं सर्टिफिकेट अनिवार्य
जे कोणी प्रवास करणार आहेत त्यांच्याकडे डॉक्टरचं सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे. व्यक्तीला फ्ल्यु किंवा फ्ल्युसारखा कोणत्याही आजाराची लक्षण नाही. त्यांचे स्क्रिनिंग करण्याची गरज नाही, असं सर्टिफिकेटमध्ये नमूद केलेलं असावं.

दुसरीकडे, मुंबईसह उपनगर, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये तर प्रत्येक बाबीची काटेकोरपणे काळजी घेतली जात आहे. या भागात जिल्हाधिकारी किंवा आयुक्त परवानगी देत नाही तोपर्यंत कोणीही या प्रतिबंधित क्षेत्रातून बाहेर जाऊन शकणार नाही. त्याचबरोबर मालेगाव, सोलापूर, अकोला, अमरावती, यवतमाळ, नागपूर या हॉस्पॉट विभागात कोणतीही प्रवासी वाहतूक होण्याआधी अतिदक्षता घ्यावी, अशा शासनाकडून सूचना देण्यात आल्या आहेत.

कोणते आहेत नवे नियम
1. नोडल अधिकाऱ्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या गंतव्यस्थानी तिथल्या नोडल अधिकाऱ्याला त्या प्रवाशांची माहिती देणे आवश्यक आहे.
2. तिथला नोडल अधिकाऱ्याने परवानगी दिली की मग प्रवासाला सुरुवात होऊ शकते.
3. ई-पास जे महाराष्ट्र पोलीस वापरतात ती सिस्टम आता नोडल अधिकारी पण बदल करून वापरू शकतात.