Post COVID-19 Care : ‘कोरोना’तून बरे झाल्यानंतर नक्की करा ‘ही’ 6 कामं, दुर्लक्ष पडू शकतं महागात

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   कोरोना व्हायरसच्या संसर्गातून बरे झाल्यानंतर बहुतांश लोकांच्या शरीरात अँटीबॉडी तयार होत आहे. ही अँटीबॉडी शरीराला पुन्हा व्हायरसच्या संपर्कात आल्यानंतर वाचवते. मात्र, ही इम्यूनिटी शरीरात कधीपर्यंत राहाते, यावर अजूनपर्यंत संपूर्ण जगात एकमत झालेले नाही. काही अशीही प्रकरणे समोर आली आहेत, जेथे लोक बरे होऊन पुन्हा संक्रमित झाले आहेत.

कोरोना व्हायरसमुळे दुसर्‍यांदा संक्रमित होणार्‍यांमध्ये एकतर ज्येष्ठ आहेत किंवा ते लोक आहेत, ज्यांनी बरे झाल्यानंतर बेजबादारपणा केला. मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि हात धुण्याचे नियम सर्वांसाठी आहेत, परंतु व्हायरसच्या संसर्गातून बरे झालेल्या लोकांनी आणखी काही खास गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. याबाबत जाणून घेवूयात…

बरे झाल्यानंतर अशी घ्या काळजी

1 नियमित एक्सरसाइज करा

हळुहळु एक्सरसाइज करण्यास सुरूवात करा. दिनक्रमात एक्सरसाइज सहभागी केल्यानंतर शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या फिट राहू शकता.

2 पौष्टिक आहार

आहारात ऑर्गेनिक प्रॉडक्ट, हिरव्या भाज्या, अंडे इत्यादी पौष्टिक आहार सेवन करा. मात्र याचे आवश्यकतेपेक्षा जास्त सेवन करू नका.

3 स्मरणशक्ती वाढवणारे व्यायाम

कोरोना व्हायरस मेमरी सेल्सचे सुद्धा नुकसान करतो. यासाठी पझल्स किंवा असेच इतर गेम खेळा, ज्यामध्ये मेंदूचा जास्त वापर असेल. मात्र, जास्त ताण घेऊ नका.

4 हळुहळु पुढे जा

रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर जीवन घाईघाईने सुरू करू नका. हळुहळु जुन्या दिनक्रमावर येण्याचा प्रयत्न करा.

5 इशार्‍याचे संकेत समजून घ्या

डोकेदुखी, थकवा, अशा समस्या जाणवत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. डॉक्टरांशी संपर्क साधा.

6 इतरांची मदत घ्या

बरे होण्याच्या प्रक्रियेत इतरांना सहभागी करून घ्या. जास्तीतजास्त आराम करा. कुटुंबियांची, मित्रांची मदत घ्या. यामुळे आराम मिळेल.