Post Office | विना जोखीम 124 महिन्यात ‘डबल’ करा आपले पैसे, सुरक्षेची 100% खात्री, जाणून घ्या काय आहे योजना?

नवी दिल्ली : Post Office | पोस्ट ऑफिसकडून पैसे डबल करणारी योजना (Post office scheme) चालवली जाते. ज्यामध्ये काही महिन्यासाठी पैसे लावून दुप्पट (double money) करू शकता. यामध्ये जोखीम कमी असून पैशांची सुद्धा बचत होते. या योजनेचे नाव पोस्ट ऑफिस किसान विकासपत्र (Kisan Vikas Patra) आहे. योजनेंतर्गत तुम्ही तुमचे पैसे 124 महिन्यात दुप्पट करू शकता.

किसान विकासपत्र (Kisan Vikas Patra Scheme) भारत सरकारची एक वन टाइम इन्व्हेस्टमेंट स्कीम आहे, ज्या अंतर्गत एका ठराविक कालावधीत तुमचे पैसे दुप्पट होतात. कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये आणि सरकारी बँकांमध्ये घेऊ शकता. याबाबतची प्रक्रिया जाणून घेवूयात :

किती मिळेल व्याज?

पोस्ट ऑफिसच्या (Post Office) स्कीममध्ये वार्षिक 6.9 टक्केच्या दराने व्याज मिळते. हे व्याजदर 1 एप्रिल 2020 पासून लागू आहेत. या स्कीममध्ये गुंतवणूक केल्यावर तुमचे पैसे 124 महिन्यात (10 वर्षे आणि 4 महिने) डबल होतील. उदाहरणार्थ तुम्ही या योजनेत 1 लाख रुपयांची गुंतवणूक केलीत, तर 124 महिन्यानंतर तुम्हाला 2 लाख रुपये मिळतील.

हजार रुपयांची किमान गुंतवणुक आवश्यक

केव्हीपी भारत सरकारद्वारे जारी एक वन टाइम इन्व्हेस्टमेंट स्कीम आहे, जेथे ठरलेल्या कालावधीत तुमचे पैसे दुप्पट होतात. याचा मॅच्युरिटी पीरियड सध्या 124 महीने आहे. यामध्ये किमान गुंतवणूक 1,000 रुपयांची करता येते. कमाल गुंतवणुकीसाठी कोणतीही मर्यादा नाही.

कोण उघडू शकतात खाते

किसान विकास पत्रात गुंतवणूक करणार्‍याचे वय किमान 18 वर्षे असणे जरूरी आहे. यामध्ये सिंगल अकाऊंटशिवाय जॉईंट अकाऊंटसुद्धा काढू शकता. ही योजना अल्पवयीनांसाठी सुद्धा आहे. ज्याची देखरेख पालकांना करावी लागते. ही योजना हिंदू विभक्त कुटुंबांना वगळून ट्रस्टसाठी सुद्धा लागू आहे.

कसे उघडू शकता खाते?

यासाठी जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन फॉर्म भरून खाते उघडू शकता. याशिवाय फॉर्म आनलाइन सुद्धा डाऊनलोड करता येतो.
फॉर्मवर पूर्ण नाव, जन्म तारीख आणि व्यक्तीचा पत्ता लिहावा लागेल.
फॉर्ममध्ये पर्चेस अमाऊंटची मात्रा स्पष्ट लिहावी.
केव्हीपी फॉर्मची रक्कम रोख किंवा चेकने भरता येते.
चेकने पैसे भरल्यास, फॉर्मवर चेकनंबरची माहिती लिहा.

हे देखील वाचा

Mumbai Pune Taxi | मुंबई-पुणे टॅक्सी प्रवास महागला; 100 रुपयांची भाडेवाढ

Pune Cyber Crime | लग्नाचे आमिष दाखवून महिलेला 16 लाखांना घातला गंडा; डेबीड, क्रेडिट कार्डची माहिती मिळवून केला गैरव्यवहार

Pune Crime | पुण्यातील औंधमध्ये वडिलोपार्जित मालमत्तेसाठी मोठ्या बहिणीला पेटविले

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Post Office | earn double money from post office kisan vikas patra scheme with 100 pc guarantee check how

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update