Pune Crime | पुण्यातील औंधमध्ये वडिलोपार्जित मालमत्तेसाठी मोठ्या बहिणीला पेटविले

पुणे : Pune Crime | ते सख्ये बहिण भाऊ असून वडिलांच्या संपत्तीवरुन त्यांच्या वाद निर्माण झाला. त्यातून भावाने बहिणीच्या घरी जाऊन तिला पेटविल्याची घटना औंधमध्ये (Aundh) शनिवारी घडली. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी (chaturshringi police station) भावाला अटक (Pune Crime) केली आहे

.
शाम मनोहर पतंगे Shyam Manohar Patange (वय ४५, रा. यशोधन सोसायटी, चिंतामणीनगर, बिबवेवाडी) असे अटक केलेल्या भावाचे नाव आहे. याप्रकरणी औंधमध्ये राहणार्‍या ४५ वर्षाच्या बहिणीने फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी आणि आरोपी हे नात्याने सख्ये भाऊ बहिण आहेत. वडिलांच्या संपत्तीवरुन दोघांमध्ये वाद आहेत. फिर्यादी या औंधमधील घरी असताना शनिवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास शाम पतंगे त्यांच्या घरी दारु पिऊन आला. त्यांच्याशी वाद घातला. फिर्यादी या स्वयंपाक घरामध्ये खुर्चीवर बसून आराम करीत असताना शाम याने त्याच्याकडील माचिसच्या काडीने फिर्यादी यांना आग लावून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये फिर्यादी यांची हनुवटी, दोन्ही गाल तसेच मानेपासून खाली पायापर्यंतचा सर्व भाग भाजलेला आहे. चतु:श्रृंगी पोलिसांनी शाम पतंगे याला अटक केली आहे.

हे देखील वाचा

Gold Price Update | सोन्याच्या किमतीत मोठ्या घसरणीमुळे ग्राहक खुश ! 9926 रुपयांपर्यंत स्वस्त झाले सोने; जाणून घ्या 14 ते 24 कॅरेट गोल्डचे नवीन दर

Pune Crime | लग्नाच्या 3 महिन्यानंतर देखील पत्नी ‘हात’ लावू देत नव्हती, पतीच्या हाती लागला मोबाईल अन् ‘लगट’ करतेवेळीचा ‘पर्दाफाश’

PM Mandhan Yojana | 55 रुपये खर्च केल्यास दरमहा बँक अकाऊंटमध्ये येतील 3000 रुपये, जाणून घ्या पूर्ण स्कीम

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Crime | In Aundh, Pune, his elder sister was set on fire for ancestral property; chaturshringi police arrest shyam manohar patange

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update