नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बचतीसाठी पोस्ट ऑफिसच्या अनेक स्किम आहेत. यापैकी एक असलेली मंथली इन्कम स्कीम (Post Office MIS Account). या मंथली स्कीम बद्दल (Post Office MIS Account) तुम्ही ऐकले असेलच. नावाप्रमाणेच ही योजना मासिक उत्पन्नासाठी आहे. या योजनेमध्ये दर महिन्याला पैसे गुंतवले (Invested) तर काही ना काही कमाई होते. याला मासिक उत्पन्न (Monthly Income) किंवा मासिक रिटर्न (Monthly Return) म्हणता येईल. तुम्हाला दरमहिन्याला किती पैसे गुंतवता यावर तुमचा मासिक परतावा अवलंबून आहे. पेन्शन योजनेच्या (Pension scheme) गरजा पूर्ण करण्यासाठी ही योजना करण्यात आली आहे.
जर तुम्ही सरकारी किंवा एखाद्या मोठ्या खाजगी कंपनीत काम करत नसाल आणि पेन्शनची व्यवस्था करायची असेल तर ही योजना चांगला पर्याय देत. ही योजना पोस्ट ऑफिस द्वारे चालवली जाते. त्यामुळे पोस्टाची ही मंथली इन्कम स्कीम (Post Office MIS Account) लोकप्रिय आहे. पोस्ट ऑफिसची योजना जोखीम मुक्त गुंतवणूक (Investment) मानली जाते. यामुळे एमआयएससारख्या योजनांमध्ये लोकांना खूप रस आहे.
पोस्ट ऑफिस MIS मध्ये पैसे गुंतवतानाच तुम्हाला किती टक्के रिटर्न मिळणार आहे हे समजते. याचा अर्थ खात्रीशीर परतावा मिळविण्यासाठी तुम्ही MIS मध्ये गुंतवणूक करु शकता. योजना घेताना जो दर निश्चित केला जाईल, त्याच दरानं तुम्हाला आर्थिक वर्षाच्या एक चतुर्थांश पर्यंत व्याज (Interest) जोडून परतावा दिला जातो. याशिवाय या योजनेत गुंतवणुकीवर करात (Tax) सूट देण्याची सुविधा आहे. हे खातं उघडण्यास कोणतीही अडचण नाही आणि तुम्ही ते तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये सुरु करु शकता. खाते उघडताना तुम्हाला एक हजार जमा करावे लागतील आणि ही किमान ठेव रक्कम आहे. जर तुम्हाला जास्त रक्कम जमा करायची असेल तर हजाराच्या पटीत ही रक्कम जमा करु शकता.
किती मिळणार व्याज?
जर तुमचे एक खाते असेल तर जास्तीत जास्त साडे चार लाख आणि संयुक्त खाते असेल तर एका वर्षात जास्तीत जास्त नऊ लाख जमा होऊ शकतात.
सध्या MIS वर 6 टक्के व्याज मिळत आहे. या व्याजदरामुळे तुम्ही तुमच्या गुंतवणुकीचा परतावा सहज समजू शकता.
दर महिन्याला खात्यात किमान एक हजार रुपये जमा करावे लागतील, तरच तुम्हाला मासिक उत्पन्नाचा लाभ मिळेल.
कसा मिळेल परतावा
जर तुम्ही पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत 4 लाख रुपये एकरकमी जमा केले.
सध्याच्या 6.6 टक्के व्याजदरानुसार तुम्हाला 2200 रुपये मिळतील.
तुम्ही जर MIS 5 वर्षे म्हणजे 60 महिन्यांसाठी गुंतवणूक केली तर तुम्हाला व्याज म्हणून 1 लाख 32 हजार मिळतील.
हे तुमचे निव्वळ उत्पन्न असेल. येथे 5 वर्षे म्हणजे लॉक इन कालावधी ज्या दरम्यान तुम्ही खातं बंद करु शकत नाही किंवा पैसे काढू शकत नाही.
MIS खात कसं उघडायचं?
– तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसच्या शाखेला भेट द्या
– अर्ज घेऊन सर्व तपशील भरा
– आवश्यक कागदपत्रं सबमिट करा. ओळखीचा पुरावा आणि पत्ता पडताळणी पूर्ण करा. गुंतवणुकदाराने स्वत: कागदपत्रांची पडताळणी करावी.
– नामनिर्देशित (Nominated) व्यक्तीचे तपशील (जर असेल) प्रविष्ट करा. तथापि, नामनिर्देशित तपशील देखील नंतर जोडले जाऊ शकतात.
– रोख किंवा चेक जमा करा (किमान 1000) आणि खाते उघडा.
चेक पोस्ट-डेटेड चेक असल्यास, खाते उघडण्याची तारीख चेकवर लिहिलेली तारीख असेल.
Web Title :- Post Office MIS Account | check mis interest rate 2022 and post office nonthly income scheme calculator know more
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update