Post Office Saving Scheme | तुम्ही सुद्धा उघडले असेल PPF आणि सुकन्या समृद्धीमध्ये खाते तर आता होईल मोठा फायदा; सरकारने दिली माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Post Office Saving Scheme | पोस्ट ऑफिस (Post Office) हा पैशाच्या बचतीसाठी सर्वोत्तम पर्याय मानला जातो. तुम्ही पोस्ट ऑफिस बचत योजनांमध्ये (Post Office Saving Scheme) पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे.

 

आज आम्ही तुम्हाला सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana), PPF, NSC योजनांशी संबंधित एक खास गोष्ट सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही या योजनांमध्ये सहज पैसे गुंतवू शकता.

 

पोस्ट ऑफिस ग्राहकांना बचत योजनेवर ऑनलाइन पैसे जमा करण्याची सुविधा देते, म्हणजेच आता तुम्ही घरबसल्या या योजनांमध्ये पैसे गुंतवू शकता. यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही.

 

सुरुवातीला, खाते उघडण्यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिसला एकदाच भेट द्यावी लागेल. यानंतर तुम्ही घरी बसून रक्कम ऑनलाइन जमा करू शकता.

 

पोस्ट ऑफिसमध्ये ग्राहकांना 9 प्रकारच्या बचत योजना दिल्या जातात. यामध्ये तुम्हाला पीपीएफ, आरडी, सुकन्या समृद्धी योजनेसह अनेक विशेष योजनांमध्ये पैसे गुंतवण्याचा पर्याय मिळतो. (Post Office Saving Scheme)

 

पोस्ट ऑफिस बचत योजनेमध्ये, तुम्हाला प्राप्तीकर कायद्याच्या कलम 80सी अंतर्गत कर सूट (Tax benefit) देण्याची सुविधा देखील मिळते. PPF वर 7.1 टक्के तर मुलींसाठी सुकन्या समृद्धी ठेव योजनेत 7.6 टक्के व्याज मिळत आहे.

पोस्टाच्या योजनेत असे करा ऑनलाइन पैसे ट्रान्सफर

ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी, तुम्हाला प्रथम IPPB मध्ये पैसे ट्रान्सफर करावे लागतील.

यानंतर तुम्हाला डीओपी उत्पादनांवर जावे लागेल.

येथे तुम्हाला PPF किंवा सुकन्या समृद्धीचा पर्याय दिसेल.

तुम्हाला ज्या प्लॅनमध्ये पैसे ट्रान्सफर करायचे आहेत तो निवडा.

आता तुमचा DOP ग्राहक आयडी नोंदवा.

आता येथे तुम्ही इन्स्टॉलमेंट रक्कम निवडा, त्यानंतर तुमचे पैसे ऑनलाइन ट्रान्सफर केले जातील.

 

Web Title :-  Post Office Saving Scheme | post office scheme ppf account sukanya samriddhi yojana interest rate post office scheme for girls

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | विनयभंगातील आरोपीला काही तासातच अटक केल्यानंतर न्यायालयाकडून 18 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा

 

Bigg Boss 15 | ‘बिग बॉस 15’ फिनालेच्या सेटवर पोहोचली श्वेता तिवारी, कॅमेर्‍यासमोर इशार्‍यामध्ये केला विजेताच्या नावाचा खुलासा

 

Pune Corona Updates | पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे पुन्हा 5000 पेक्षा जास्त नवे रूग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी