Pune Corona Updates | पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे पुन्हा 5000 पेक्षा जास्त नवे रूग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरामध्ये कोरोना बाधित (Pune Corona Updates) रुग्णांची संख्या वाढत असताना रुग्ण बरे (Recover) होण्याचे प्रमाण वाढत आहे. सलग दुसऱ्या दिवशी शहरामध्ये आठ हजाराहून अधिक रुग्णांनी कोरोनावर (Pune Corona Updates) मात केली आहे. गेल्या 24 तासात शहरात 5410 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर 8215 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मागील काही दिवसांपासून शहरातील रुग्णांच्या संख्येत चढ-उतार पहायला मिळत आहे.

 

पुणे महापालिकेच्या (PMC) आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 12 हजार 672 स्वॅब तपासणी (Swab) करण्यात आली आहे. यामध्ये 5410 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहरातील एकूण कोरोना बाधितांची (Pune Corona Updates) संख्या 6 लाख 33 हजार 468 इतकी झाली आहे. याच दरम्यान 8215 रुग्ण बरे झाले आहेत. आजपर्यंत 5 लाख 90 हजार 712 रुग्ण बरे झाले आहेत.

 

शहरातील दैनंदिन रुग्णांची संख्या वाढल्याने अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या (Active Patient) संख्येत वाढ झाली होती.
मात्र आता रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी झाली आहे.
सध्या शहरामध्ये 33 हजार 528 अ‍ॅक्टिव्ह  रुग्ण आहेत.
शहरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या तुलनेत केवळ 3.84 टक्के रुग्ण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे.
यामध्ये 358 रुग्ण ऑक्सिजनवर (Oxygen) उपचार घेत आहेत.
इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर (Invasive Ventilator) वर 51 तर नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर (Non-Invasive Ventilator) 33 रुग्ण आहेत.
गेल्या 24 तासात 15 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
यामध्ये शहरातील 7 तर शहराबाहेरील 8 रुग्णांचा समावेश आहे. आजपर्यंत शहरातील 9228 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

Web Title :- Pune Corona Updates | More than 5000 new corona patients in Pune in last 24 hours, find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा