शेतकर्‍यांच्या पिकांचं नुकसान झालं तर मोदी सरकार देणार ‘मोबदला’, तुम्हाला फक्त ‘एवढं’ करावं लागेल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकारने शेतकऱ्यांना एका मोठ्या समस्येवर दिलासा दिला आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत पिकांचे नुकसान आता सॅटेलाइटद्वारे मोजण्यात येणार आहे. या माध्यमातून स्मार्ट सॅंपलिंग होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकर मिळेल. देशातील 96 जिल्ह्यात हा प्रयोग प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात आली आहे. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी ही माहिती दिली.

तोमर यांनी संगितले की योजनेमध्ये या वर्षी फक्त धान्याच्या पिकांचे सॅंपलिंग करण्यात येईल. रब्बी पिकांच्या हंगामात इतर राज्यांच्या दुसऱ्या पिकांचा देखील यात समावेश करण्यात आला आहे. यामुळे पिकांचे योग्य अनुमान मिळेल. ज्यामुळे शेतकऱ्यांना लवकर नुकसान भरपाई मिळेल. सध्या हा प्रकल्प प्रायोगिक पद्धतीने लागू करण्यासाठी कृषि विभागाचे कर्मचारी त्या त्या जागावर जाऊन तपासणी करत आहेत.

कसा मिळेल योजनेचा लाभ –

1. पेरणीच्या 10 दिवसाच्या आता शेतकऱ्यांना PMFBY साठी अर्ज करावा लागेल.
2. विम्याच्या रक्कमेचा लाभ तेव्हा मिळेल जेव्हा पिकांची परिस्थिती अपातकालीन, नैसर्गिक कारणाने खराब होईल.
3. पेरणीपासून कापणी दरम्यान पिकांचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई मिळेल.
4. पिकांवर आपत्तीचा, ओल्या दुष्काळाचा, भूस्खलनाचा, ढगफुटी, वीज पडल्यास नुकसान भरपाई मिळेल.
5. पिकांच्या कापणीनंतर 14 दिवस शेतात सुकण्यासाठी ठेवण्यात आलेली पिके वादळी पाऊस, ओला दुष्काळामुळे खराब झाल्यास नुकसान भरपाई देण्यात येईल.
6. प्रतिकूल मान्सून स्थितीत पिकांची पेरणी करु न शकल्यास देखील योजनेचा लाभ मिळेल.

किती द्यावा लागेल प्रीमियम –

1) खरीप पिकांसाठी 2 टक्के प्रीमियम आणि रब्बी पिकांसाठी 1.5 टक्के प्रीमियम भरावा लागेल.
2) PMFBY योजनेत कमर्शियल आणि बागायातदार पिकांना देखील विमा सुरक्षा देण्यात येते. यात शेतकऱ्यांना 5 टक्के प्रीमियम द्यावा लागेल.

योजनेच्या लाभ घेण्यासाठी या कागदपत्रांची आवश्यकता आहे –

1) शेतकऱ्यांचा एक फोटो, आयडी कार्ड,
2) पत्ता, शेतातील पिकांचा पुरावा

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी