Praful Patel | ‘आता आम्ही बाळ राहिलो नाही, असे निर्णय…’, शरद पवारांचे नाव घेत प्रफुल्ल पटेलांचं विधान

भंडारा : पोलीसनामा ऑनलाइन – अजित पवार यांनी आपल्या 40 समर्थक आमदारांसह सरकारमध्ये (Shinde-Fadnavis Government) सामील होण्याचा निर्णय घेतल्यानंतर पक्षात फूट पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक दिग्गज आणि ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्यासोबत गेले आहेत. तर काही नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सोबत राहिले आहेत. राष्ट्रवादीमध्ये बंडखोरी (NCP Rebellion) झाल्यानंतर दोन्ही गटांनी एकमेकांवर जोरदार टीका केली आहे. तर काही नेत्यांकडून पक्षात फूट पडली नसल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत गेलेले ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी मोठं विधान केलं आहे. कधी कधी असे निर्णय घ्यावे लागतात. आता आम्ही बाळ राहिलो नाही, असे प्रफुल्ल पटेल (Praful Patel) म्हणाले.

बुधवारी भंडारा येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधताना प्रफुल्ल पटेल (Praful Patel) म्हणाले, आज पुन्हा मी जबाबदारीने सांगतो, शरद पवार भंडाऱ्यात आले तर मी स्वत: स्वागत करण्यासाठी जाईन. त्यांचं स्वागत आपण करायला जायचं. तुम्हीही माझ्याबरोबर यायचं. ते येतील, भाषण करतील आणि आपल्या विरोधात बोलतील. मात्र आपण ते ऐकून घ्यायचं. बापाने आपल्याला ऐकवलं तर वाईट मानून घ्यायचं नाही. त्यामुळे आपल्याला काहीही फरक पडत नाही.

आता आम्ही बाळ राहिलो नाही

शरद पवार हे माझे नेते होते, आहेत आणि उद्याही राहतील. त्यांच्याबद्दल माझ्या मनातील आदर आणि सन्मान कधीही
कमी होणार नाही. पण कधी कधी असे निर्णय घ्यावे लागतात. आता आम्ही बाळ राहिलो नाही.
एक बाब सर्वांनी समजून घेतली पाहिजे की, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून तो निर्णय घेतला आहे.
आता शेवटपर्यंत आपण सगळे राष्ट्रवादी पक्षात राहणार असल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP MP Supriya Sule | ‘राष्ट्रवादीत फूट नाही, अजित पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते’, सुप्रिया सुळेंचे मोठे विधान (व्हिडीओ)

Chandrashekhar Bawankule | ‘फोडाफोडीचे संस्कार कुणाचे हे देशाला आणि…’, सुप्रिया सुळेंच्या आरोपांवर बावनकुळेंचा पलटवार