पुणे-मुंबई-पुणे धावणारी प्रगती एक्सप्रेस 5 दिवस रद्द

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे-मुंबई-पुणे दरम्यान धावणारी प्रगती एक्सप्रेस पुढील पाच दिवस रद्द करण्यात आली आहे. बुधवार (दि. 15) ते रविवार (दि. 20) या दरम्यान प्रगती एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. खंडाळा येथे मंकी हिल ते कर्जत स्थानकादरम्यान घेण्यात आलेल्या मेगाब्लॉकमुळे प्रगती एक्सप्रेससह अन्य गाड्यांच्या वेळापत्रकामध्ये बदल झाला आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे.

रद्द झालेल्या रेल्वे गाड्या
मंबई-पंढरपूर फास्ट पॅसेंजर 17 ते 19 दरम्यान रद्द करण्यात आली आहे. मुंबई-विजापूर फास्ट पॅसेंजर 15, 16 आणि 20 ऑक्टोबरला रद्द करण्यात आली आहे. तसेच पनवेल-नांदेड स्पेशल गाडी 20 ऑक्टोबर रोजी रद्द करण्यात आली आहे. तर कोल्हापूर-मुंबई-कोल्हापूर कोयना एक्सप्रेस 15 ते 20 ऑक्टोबर या कालावधीत कोल्हापूर-पुणे-कोल्हापूर अशी धावणार आहे.

पुण्यात आणि पुण्यापर्यंत धावणाऱ्या गाड्या
हुबळी-लोकमान्य टिळक टर्मिनस-हुबळी एक्सप्रेस 15 ते 20 ऑक्टोबर दरम्यान पुण्यापर्यंत धावणार आहे. मुंबई-हैद्राबाद एक्सप्रेस 16 ते 20 ऑक्टोबर दरम्यान पुण्यातून हैदराबादला रवाना होणार आहे. तसेच पनवेल-नांदेड एक्सप्रेस 17, 18, 19 आणि 20 ऑक्टोबर रोजी पनवेल ऐवजी पुण्यातून नांदेडसाठी धावणार आहे. तर नांदेडहून येणारी गाडी पुण्यापर्यंतच धावणार आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी