लुटारूंचे सरकार उलथवून टाका : ॲड. प्रकाश आंबेडकर

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – सध्या देशात व राज्यात चोरांचे, लुटारुंचे राज्य असून हे सरकार उलथून टाका, असे आवाहन करुन उद्याची क्रांती घडवण्यासाठीच वंचित बहुजन आघाडी असल्याचे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय नेते तथा वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.

मिरजेतील अंबाबाई तालीम संस्थेच्या मैदानावर आयोजित वंचित बहुजन आघाडीच्या सत्ता संपादन मेळाव्यात ॲड. आंबेडकर हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी धनगर समाजाचे नेते जयसिंग शेंडगे होते. यावेळी बोलताना ॲड. आंबेडकर म्हणाले, देशात नवे सामाजिक पर्व सुरु करायचे आहे. महाराष्ट्रातील कुटुंबे समाधानी होण्यासाठी वंचित बहुजन आघाडीची स्थापना करण्यात आली आहे. सध्या भाजपचे असलेले सरकार हे चोरांचे आणि लुटारुंचे आहे. या चोरांच्या टोळीतील विजय मल्ल्या आणि नीरव मोदी हे दोघे परदेशात पळून गेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ते पंतप्रधान झाल्यानंतर त्यांची नीयत बदलली. सर्वसामान्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्याऐवजी त्यांनी उद्योगपतींशी हातमिळवणी करुन त्यांना मदत केली.

ते म्हणाले, सध्या महाराष्ट्रातील १७९ कुटुंबांकडेच राजकीय सत्ता कायम आहे. या कुटुंबांकडेच ही सत्ता असल्याने त्यांनी समाजातील गरीब हा आणखी गरीब कसा होईल आणि श्रीमंत हा आणखी श्रीमंत कसा होईल हे पाहिले. सहकार चळवळ मोडीत काढली. हळूहळू सहकारी साखर कारखाने बंद पडत आहेत. अनेक कारखाने आजारी आहेत. मात्र, याच कारखान्यांचे संचालक हे खासगी कारखाने काढत आहे. ही त्यांची दुटप्पी भूमिका आहे. बाजार समित्या या लुटारुंचा अड्डा झाल्या आहेत. व्यापारी आणि संचालकांमध्ये साटेलोटे आहे. शेतमालाला भाव मिळत नाही. आजचा राज्यकर्ता हा प्रतिगामी, सौदेबाज आणि लुटारु आहे.

नोटाबंदीच्या काळात नोटा बदलण्यासाठी ६०-४० चा फॉर्म्युला वापरला गेला. १०० रुपयांच्या बदल्यात ६० रुपये मिळाले तर नोटा बदलणाऱ्याने ४० रुपये कमिशन घेतले. लोकांनी कष्टाने मिळवलेला पैसा या सरकारने घालवला. ते लोक पुन्हा मोदींना निवडून देणार नाहीत. क्रे डिट कार्ड, डेबिट कार्ड, पेटीएम, व्हिसा या कंपन्यांवर भारतीयांची मालकी नसून या परदेशी कंपन्या आहेत. या कंपन्यांच्या व्यवहाराचा वापर वाढवण्यासाठी सरकारकडून सांगितले जाते. मात्र, याचा फायदा परदेशी कंपन्यांना होत आहे. पेटीएम ही कंपनी चीनची आहे. चीनने सीमेवर लष्कर तैनात केले आहे. मग पेटीएमचा वापर करुन चीनची आर्थिक ताकद का वाढवली जात आहे असा सवालही ॲड. आंबेडकर यांनी उपस्थित केला. प्रा