Prakash Ambedkar On Mahavikas Aghadi | महाविकास आघाडीला मुस्लीम मते पाहिजेत, पण मुस्लीम उमेदवार नकोत : प्रकाश आंबेडकर

मुंबई : Prakash Ambedkar On Mahavikas Aghadi | आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी (Bhim Jayanti) प्रकाश आंबेडकर यांनी एक्सवर केलेली एक पोस्ट खुपच चर्चेत आहे. या पोस्टमध्ये आंबेडकर यांनी महाविकास आघाडीवर गंभीर आरापे केला आहे. महाविकास आघाडीला मुस्लीम मते पाहिजे, पण मुस्लीम उमेदवार नको, मग भाजपामध्ये (BJP) आणि यांच्यात फरक काय, असा सवाल देखील आंबेडकर यांनी विचारला आहे. या पोस्टमध्ये आंबेडकर यांनी माध्यमांना देखील एक प्रश्न विचारला आहे.

एक्सवर केलेल्या आपल्या पोस्टमध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे की, आज भीम जयंतीच्या दिवशी, मला समावेश आणि बहिष्कारावर एक मुद्दा मांडायचा आहे. मविआने अद्याप एकाही मुस्लिम उमेदवाराला उमेदवारी दिलेली नाही. (Prakash Ambedkar On Mahavikas Aghadi)

या पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, जर मविआला भाजपप्रमाणे (BJP) मुस्लिमांना वगळायचे असेल तर दोघांमध्ये फरक काय? मुख्य प्रवाहातील माध्यमे मुस्लिमांना अशाप्रकारे वगळण्यावर गप्प का? असा सवाल आंबेडकर यांनी माध्यमांना देखील केला आहे. या पोस्टच्या शेवटी आंबेडकरांनी लिहिले आहे की, महाविकास आघाडीला मुस्लिमांची मते पाहिजेत, पण मुस्लिम उमेदवार नकोत.

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीमधून बाहेर पडल्यानंतर आपले अनेक उमेदवार लोकसभा निवडणुकीसाठी उभे केले आहेत. वंचितने कुणबी मराठा ३, मराठा २, बौद्ध ३, मुस्लिम ३, धनगर २, बंजारा २, आदिवासी १, लिंगायत १, माळी २, तेली १, मातंग १, जैन १ असे एकूण २२ सर्वजातीय, सर्वधर्मीय उमेदवार लोकसभा निवडणुकीसाठी दिले आहेत.

विशेष म्हणजे, वंचितने मविआच्या काही निवडक उमेदवारांना पाठिंबा दिला आहे.
वंचितने ७ मतदारसंघात इतर उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आहे.
त्यामध्ये अमरावतीत (Amravati Lok Sabha) आंबेडकर यांचे सख्खे बंधू आंनदराज आंबेडकर (Anandraj Ambedkar),
रामटेकमध्ये (Ramtek Lok Sabha) अपक्ष उमेदवार किशोर गजभिये,
नागपुरमध्ये (Nagpur Lok Sabha) काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे (Vikas Thackeray),
बारामतीत (Baramati Lok Sabha) राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि
कोल्हापुरात (Kolhapur Lok Sabha) काँग्रेसचे श्रीमंत शाहू महाराज यांना वंचितने बिनशर्त पाठिंबा दिला आहे.

यामुळे मविआची धरले तर चावते आणि सोडले तर पळते अशी अवस्था झाली आहे,
तर वंचितची सध्यातरी सरशी झाल्याचे दिसत आहे.
उलट, काँग्रेसने अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात उमेदवार देऊन
आपल्या चुकीच्या वृत्तीचे दर्शन समस्त महाराष्ट्राला घडवले आहे.
यावरून मविआतील एका मित्रपक्षाने शरद पवार (Sharad Pawar) यांना पत्र देखील लिहिले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sushma andhare | सुषमा अंधारे यांच्याविरूद्ध निवडणूक आयोगाकडे तक्रार, ‘त्या’ पत्रकार परिषदेतील छोट्या बाळाच्या उपस्थितीवर आक्षेप

Pimpri Chinchwad Crime Branch | पिंपरी : घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्यावर गुन्हे शाखेची कारवाई, सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल जप्त