Prakash Ambedkar On PM Narendra Modi | प्रकाश आंबेडकरांचा पंतप्रधान मोंदींवर भ्रष्टाचाराचा आरोप

अकोला : Prakash Ambedkar On PM Narendra Modi | या बाबाचं खाणंही वेगळं आहे. तो खात नाही हे सर्टिफिकेट मी तुम्हाला देतो. पण तो दुसऱ्यांना खाऊ घालतो हे लक्षात घ्या. तो स्वतः खात नाही, तो दुसऱ्यांना खाऊ घालतो. आणि दुसऱ्यांना खाऊ घातलं की त्यांना म्हणतो की अर्ध मला, असा भ्रष्टाचाराचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला आहे. ते अकोल्यात जाहीर सभेत बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वैयक्तिक टीका करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, मोदी घोषणा करतात की ना खाऊंगा, ना खाने दुंगा. आपल्याला काय वाटतं, याने बायको सोडून दिली आहे.

मुलंही नाहीत. मग कोणासाठी कमावणार? आपल्यालाही खरं वाटतं. की एकटाच आहे, तर कमवणार कोणासाठी? आगे पिछे कोणीच नाही. आणि म्हणून आपल्याला विश्वास वाटतो का बाबा खरं बोलतो, अशी बोचरी टीका आंबेडकर यांनी केली.

मोदींना हरवायचं असेल तर जागा वाटपात न अडकता सर्व पक्षांनी एकत्र येऊन लढलं पाहिजे, असे आवाहन देखील आंबेडकर यांनी विरोधी पक्षांना केले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Cheating Fraud Case | पुणे : जास्त परतावा देण्याच्या बहाण्याने 36 लाखांची फसवणूक, आरोपीवर MPID

Sanjay Raut On Eknath Shinde | काय ही लाचारी… बाळासाहेब ठाकरे असते तर यांचा कडेलोट केला असता, संजय राऊतांचा शिंदे गटावर पलटवार

Pune Pimpri ACB Trap Case | देहुरोड विभागाचे ACP मुगूटलाल पाटील यांच्याकरिता 5 लाखाच्या लाचेची मागणी; 1 लाखाचा पहिला हप्ता घेताना ओंकार जाधव अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Police Inspector Transfers | चतुःश्रृंगी, लष्कर पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या

Pimpri Chinchwad Crime Branch | पिंपरी : बेकायदेशीर गांजा बाळगणाऱ्या दोन महिलांना अटक, सव्वा लाखांचा गांजा जप्त