मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी एका कार्यक्रमादरम्यान बोलताना शरद पवार (Sharad Pawar) हे आजही भाजपचेच आहेत. असे वक्तव्य केले होते. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला जात आहे. दरम्यान, यावर माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
आज (दि.२७) माध्यमांशी संवाद साधताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ‘इतिहासातील काही घटनांवरून मी ते विधान केलं होतं. त्याचा आत्ताच्या परिस्थितीशी काही एक संबंध नाही. कुणी त्याला चुकीच्या पध्दतीने घेत असेल तर याला आपण काहीही करू शकत नाही.’ असं यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.
तर यावर पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले की,
‘भाजपाला (BJP) तुम्ही कमी लेखू नका. भाजपा कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही स्थराला जाऊ शकते.
भांडण लावणे, मतभेद निर्माण करणे हा त्यांचा फंडा आहे. जेव्हा आपण निवडणुक जिंकत नाही, असं भाजपाला वाटतं तेव्हा ते भांडणं लावण्याचे काम करतात.’ अशी टीका यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी भाजपावर केली.
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीच्या (VBA) महाविकास आघाडी प्रवेशावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
यांनी भाष्य केले. एका कार्यक्रमाला आले असता, पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, प्रकाश आंबेडकर
हे महाविकास (MVA) आघाडीमध्ये नाहीत. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी युती केली आहे.
त्यांचा आमच्याकडे कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. त्यामुळे महाविकास आघाडीचा आणि त्यांचा काहीही संबंध नाही.
असं यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले.
Web Title :- Prakash Ambedkar | prakash ambedkar clarification on statement regarding sharad pawar with bjp
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Chhagan Bhujbal | नाशिक पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचा विजय निश्चित – छगन भुजबळ