Prakash Ambedkar | ‘ठाकरे आणि आमचा साखरपुडा झालाय, मात्र लग्नाच्या मुहूर्तासाठी…’, प्रकाश आंबेडकर यांचे काँग्रेस-राष्ट्रवादीला चिमटे

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन – आपल्या आणि उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) मैत्रीमध्ये काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी (NCP) खोडा घालत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केला आहे. ते अकोला येथे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी शरद पवार गटावर (Sharad Pawar Group) टीकास्त्र सोडलं. ठाकरे आणि आमचा साखरपुडा झाला आहे. मात्र, लग्नाच्या मुहूर्तासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीरुपी दोन भटजीच अडथळे आणत असल्याचे म्हणत प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी म्हटले.

एकाएकाची पोलखोल करणार

प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही राजकीय पक्ष अस्पृश्यता पाळतात. आता मी एकाएकाची पोलखोल करणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. तसेच मी आतापर्यंत कुटुंबामुळे शांत होतो. कुटूंबातील मुलं मोठी झालीत, त्यामुळे आता काही लोकांबद्दल बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बिना लग्नाचे राहू पण…

प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले, वेळप्रसंगी बिना लग्नाचं राहू, परंतु, दुसरं स्थळ पाहणार नाही, असे सांगत त्यांनी इतर दुसऱ्या पक्षासोबत आघाडी करणार नसल्याचे स्पष्ट केलं. त्यामुळे दुसरा मार्गच नसल्यानं स्वबळावर लोकसभेच्या 48 जागांची तयारी सुरु केल्याचे त्यांनी सांगितले.

नाराज पक्षांना संपर्क करणार नाही

महायुती आणि मविआ मधील कोणत्याही नाराज पक्षांशी स्वत:हून संपर्क साधणार नसल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं.
महादेव जानकर (Mahadev Jankar), सदाभाऊ खोत (Sadabhau Khot), राजू शेट्टी (Raju Shetty)
यांना कुणाशी लढायचं यावरुन संभ्रम आहे. यापैकी कुणाशीच आघाडी होण्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली.
शिवसेनेच्या ठाकरे गटाने (Shivsena Thackeray Group) लोकसभेसाठी पाच जागांचा प्रस्ताव दिल्याच्या चर्चेचं त्यांनी खंडन केलं आहे.
तसेच सुजात आंबेडकर अकोल्यातून लोकसभा किंवा विधानसभेची कोणतीच
निवडणूक लढणार नसल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Vijay Wadettiwar | मुजोर सरकारला झुकावं लागलं, विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल