प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिसाद द्यावा : अशोक चव्हाण

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन 

भारिप बहुजन महासंघाचे सर्वेसर्वा अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी खासदार व्हावे, अशी आमची इच्छा आहे. त्यांना आमचा पाठिंबा आहे. आमच्याकडून बोलणी तोडलेली नाही. त्यांनी आम्हाला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले आहे. चव्हाण हे औरंगाबादमध्ये पत्रकारांशी बोलत होते. काँग्रेसकडून हवा तसा प्रतिसाद मिळत नाही, असे काही दिवसांपूर्वी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले होते. त्यामुळे चव्हाण यांनी एकत्र येण्यासाठी आता त्यांना जाहिर आवाहन केल्याचे दिसून येत आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’22aac9dc-cf63-11e8-a131-0bd26b898a60′]

अशोक चव्हाण म्हणाले, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडीची बोलणी सुरू आहे. समविचारी पक्षांना सोबत घेण्याचीही आमची तयारी आहे. त्यात कोणते पक्ष येऊ शकतात? त्यांना किती जागा द्याव्यात, याबाबत बोलणी सुरू आहे. शिवसेना आणि एमआयएम या दोन्ही पक्षांची विचारसरणी समान आहे. त्यामुळे एमआयएमशी जमेल असे वाटत नाही. मात्र प्रकाश आंबेडकर यांनी सोबत यावे, अशी आमची इच्छा आहे. त्यांच्याशी माणिकराव ठाकरे, राधाकृष्ण विखे पाटील यांनी चर्चा केली. त्यांनी आम्हाला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन चव्हाण यांनी केले. भाजप सरकारवर टीका करताना चव्हाण म्हणाले, सध्याची राज्यातील परिस्थिती पाहता लोक मंत्र्यांना फिरू देणार नाहीत, अशी परिस्थिती आहे. चार वर्षांत सरकारने दिलेले आश्वासन पाळले नाही. त्याचा फटका बसणार आहे. जनसंघर्ष यात्रेतून काँग्रेस उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. नगरची जागा काँग्रेसने लढवावी, अशी आमची इच्छा आहे. आपण लोकसभा लढविणार की विधानसभा असे विचारले असता चव्हाण म्हणाले, पक्ष सांगेल ती जबाबदारी स्वीकारण्यास तयार आहे. वेट अँड वॉच असे सूचक वक्तव्य त्यांनी केले. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागांच्या अदलाबदला बाबत प्राथमिक चर्चा सुरू आहे. जालना लोकसभेसाठी काँग्रेसकडे उमेदवार आहे, असे चव्हाण यांनी सांगितले.

[amazon_link asins=’B07GYSG9YS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2ad257fd-cf63-11e8-b212-c9b3d83550f7′]

मीटू प्रकरणात केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्र्यावर आरोप झाले आहेत. याबाबत पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, या खात्याच्या कॅबिनेट मंत्री सुषमा स्वराज्य या ज्येष्ठ नेत्या आहेत. या मंत्र्याला परदेशातून परत येण्याविषयी सांगूनही ते आले नाहीत. त्यांची वाट न पाहता मंत्रिमंडळातून हाकलून दिले पाहिजे. त्यांच्यावर झालेले आरोप संतापजनक असून देशातील जनता चिडली आहे. त्यांचा सन्मानपूर्वक राजीनामा न घेता बडतर्फ केले पाहिजे. सुषमा स्वराज व महिला मंत्र्यांनी अकबर यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही राहिले पाहिजे. पंतप्रधान ऐकत नसतील तर टोकाची भूमिका घेतली पाहिजे.

धक्कादायक…… पुण्यात संतप्त नागरिकांनी सराईत गुन्हेगाराला ठेचले ; गुन्हेगाराचा मृत्यू