Pramod Bhangire | प्रमोद भानगिरे यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना निवेदन; केल्या ‘या’ 16 मागण्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation) नव्याने समाविष्ट झालेल्या गावांतील समस्या गंभीर असून, त्या समस्या लवकरात लवकर सोडवाव्यात; तसेच पुणे शहरातील (Pune City) इतर प्रश्न सोडवण्यासाठी विशेष बैठक घ्यावी, अशी मागणी बाळासाहेबांची शिवसेना (Balasaheb’s Shivsena) पुणे शहरप्रमुख प्रमोद भानगिरे (Pramod Bhangire) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडे केली आहे. प्रमोद भानगिरे (Pramod Bhangire) यांनी मुख्यमंत्र्यांना पुणे शहरातील 16 मागण्यांचे निवेदन दिले आहे.

प्रमोद भानगिरे (Pramod Bhangire) यांनी केलेल्या मागण्या…

1. पुणे शहरातील वाहतूक कोंडी (Traffic Jam)
2. PMPML कर्मचाऱ्यांचे 7 व्या वेतन आयोगाचे (7th Pay Commission) वेतन लवकर द्यावे
3. सय्यदनगर-हांडेवाडी अंडरपास करावा
4. पुणे शहरासाठी पाणी वाढवावे
5. कोंढवा बायपास लवकरात लवकर करावा
6. पुणे शहरातील सर्व भागात समान पाणीपुरवठा व्हावा (Pune Water Supply)
7. काळेपडळ येथे गुन्हेगारी जास्त असल्याने लवकरात लवकर पोलीस स्टेशन व्हावे
8. निवासी मिळकतींना 40 टक्के कर सवलत पुन्हा सुरू करावी
9. नव्याने समाविष्ट गावांच्या विकासासाठी हजार कोटींचे अनुदान मिळावे
10. गुंठेवारी प्रक्रिया सुलभ करून सर्वसामान्यांना तातडीने दिलासा मिळावा
11. शहरासाठी मुळशी धरणातून 5 टीएमसी पाणी मिळावे
12. प्राण्यांच्या हॉस्पिटलला मुख्य सभेत मान्यता मिळाली आहे. ती रद्द करावी
13. ससूनच्या धर्तीवर पुण्यासाठी आणखी एक हॉस्पिटल हडपसर भागात व्हावे
14. पुणे महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी रुजू करून घ्यावे
15. बेकायदा बाइक टॅक्सी बंद कराव्यात
16. पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य खात्याकडील किटक प्रतिबंधक विभागामधील सेवानिवृत्त व कार्यरत असलेल्या वर्ग चारमधील कामगारांना लाड व पागे समितीच्या घाणभत्ता व वशिला वारस करारप्रमाणे त्यांच्या दैनंदिन कामाच्या स्वरूपानुसार त्यांना घाणभत्ता व धुलाईभत्ता आणि वारसा हक्क लागू करावा.

 

Web Title :- Pramod Bhangire | Statement by Pramod Bhangire to Chief Minister Eknath Shinde; Made ‘this’ 16 demands

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | एसबीआय बँकेत नोकरीच्या बहाण्याने तरुणाची 5 लाखांची फसवणूक; ताडीवाला रोड परिसरातील घटना

Gujarat Election results | “गुजरात जिंकलात आता महाराष्ट्र होऊन जाऊ दे”; आदित्य ठाकरेंचे भाजपला आव्हान

Navneet Rana | संजय राऊतांना आलेल्या धमकीची चौकशी झाली पाहिजे; त्यांची वक्तव्ये म्हणजे…