Prarthana Behere | प्रार्थना बेहेरेने सांगितला वजन कमी करण्याचा हटके फंडा; “जेवण कमी करण्याची गरज नाही…”

पोलीसनामा ऑनलाइन – मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्रार्थना बेहेरे (Prarthana Behere) ही नेहमी तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते. प्रार्थनाने अनेक चित्रपटांमधून आणि मालिकेमधून आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर उमटवली आहे. अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिचा चाहता वर्ग मोठा असून तिची सोशल मीडियावर फॉलोविंग स्ट्रॉग आहे. अभिनेत्री प्रार्थनाचे इंस्टाग्रामवर 2.3 मिलियन्स फॉलोवर्स आहेत. प्रार्थना देखील तिचे नवनवीन फोटोशूट आणि लाईफ अपडेट शेअर करत असते. नुकतीच तिने एक स्टोरी शेअर केली होती. प्रार्थना बेहेरेच्या (Prarthana Behere) या स्टोरीमधील कटेंटमुळे ती चर्चेत आली आहे.

अभिनेत्री प्रार्थना बेहेरे तिच्या अभिनय कौशल्यामुळे नावाजली जाते. सोशल मीडियावर ती चाहत्यांसोबत कनेक्टेड राहत असते. नुकतीच तिने एक स्टोरी शेअर केली होती. तिची ही स्टोरी खूप व्हायरल झाली आहे. यामध्ये असे लिहिले आहे की, “तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल तर व्यायाम किंवा योग्य आहाराची आवश्यकता नाही. त्यासाठी फक्त तुम्ही चुकीच्या माणसाच्या प्रेमात पडा.” अशा आशयाचा कोट इन्स्टा स्टोरीमध्ये शेअर करत तिने हसण्याचे इमोजी देखील टाकले आहे.

अभिनेत्री प्रार्थना बेहेरे (Prarthana Behere) हिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिचा अभिनेता स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) सोबत आलेला ‘मितवा’ हा चित्रपट (Mitwaa Movie) हिट झाला होता. त्याचबरोबर प्रार्थनाने ‘कॉफी आणि बरचं काही’ (Coffee Ani Barach Kahi), ‘मिस्टर ॲन्ड मिसेस सदाचारी’ (Mr. and Mrs. Sadachari), फुगे, ती ॲन्ड ती (Ti And Ti), लग्न मुबारक (Lagna Mubarak) या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. तसेच ती मागील काही महिन्यांपूर्वी मालिकेमध्ये देखील झळकली होती. तिने ‘माझी तुझी रेशीमगाठ’ (Majhi Tujhi Reshimgath) या मालिकेमध्ये प्रमुख भूमिका साकारली होती. यामधील प्रार्थना, अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आणि मायरा वैकुळ (Myra Vaikul) यांची ऑन स्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना फार आवडली होती.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Cough Problem | सर्दीत औषध घेणे किती योग्य किंवा किती दिवसानंतर उपचार करावा सुरू?

Prostate Cancer च्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करतात 43 टक्के पुरुष, तुम्ही करू नका ‘ही’ चूक

Constipation | मॅग्नेशियम बद्धकोष्ठता दूर करण्यात परिणामकारक उपाय आहे का? एक्‍सपर्टकडून जाणून घ्या

Diabetes – Mental Disease | ‘या’ मानसिक आजाराला बळी पडतो प्रत्येक दुसरा डायबिटीज रूग्ण,
लक्षात ठेवा ‘या’ महत्वाच्या गोष्टी