Pratap Sarnaik | ‘केले ‘प्रताप’ मविआ सरकार पाडण्याला, सरनाईक विचारती भाजपला…’, सचिन सावंत यांचा सरनाईकांना टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या आमदारांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची साथ सोडली आणि त्यापूर्वी महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) कोसळण्या अगोदर शिवसेना नेते, आमदार प्रताप सरनाईकांवर (Pratap Sarnaik) ईडीची कारवाई सुरू झाली होती. सरनाईक यांची 11.4 कोटी रुपयांची मालतमत्ता ईडीने (ED) जप्त केली. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) असताना देखील सरनाईक यांना कारवाई टाळता आली नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. परंतु आता जी मालमत्ता जप्त करण्यासाठी ईडीला हिरवा कंदील मिळाल्याने शिंदे गटासोबत (Shinde Group) असलेल्या प्रताप सरनाईकांना (Pratap Sarnaik) मोठा धक्का बसला आहे. यावरुन काँग्रेसचे (Congress) नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी ट्विटच्या माध्यमातून सरनाईकांना टोला लगावला आहे.

 

सचिन सावंत यांनी ट्विटमध्ये म्हटले, घाबरुनी भयंकर ज्या छळाला गेले ‘प्रताप’ मविआ सरकार पाडण्याला, सरनाईक विचारती भाजपला (BJP) हेची फळ काय मम तपाला? अशा शब्दात सावंत यांनी प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांना टोला लगावला आहे.

 

मार्चमध्ये झाली होती कारवाई
मार्च 2022 मध्ये ईडीकडून सरनाईक यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली होती.
प्रताप सरनाईक, त्यांचे पुत्र विहंग (Vihang Sarnaik) आणि पुर्वेश (Purvesh Sarnaik) आणि त्यांची कंपनी विहंग ग्रुप (Vihang Group) यांच्या मालकीची ही सर्व मालमत्ता आहे.
यामध्ये ठाण्यातील दोन फ्लॅट आणि एका भूखंडाचा समावेश आहे.
मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) 2016 मध्ये दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे ईडीने ही कारवाई केली होती.

 

Web Title :- Pratap Sarnaik | sachin sawant targeted pratap sarnaik due to ed action

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Navneet Rana | सुषमा आंधारेंच्या टीकेला नवनीत राणांचे प्रत्युत्तर, ‘कुणाला आळशी माणूस बघायचा असेल, तर ‘मातोश्री’वर…’

Deepika Padukone | आलियाच्या होणाऱ्या बाळासाठी दीपिकाने शेअर केली ‘ती’ पोस्ट, सगळीकडे होत आहे चर्चा

Kartiki Ekadashi | औरंगाबादचे दाम्पत्य ठरले महापूजेचे मानकरी; उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पांडुरंगाची सपत्नीक महापूजा