IPL 2019 : प्रिती झिंटाला मोठा धक्का, ‘या’मुळे ८ कोटी पाण्यात

मोहाली : वृत्तसंस्था – आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून आजतागायत अनेक युवा खेळाडू आयपीएलमुळे भारतीय संघाला मिळाले. असेच काही खेळाडू आयपीएलच्या बाराव्या हंगामाच्या लिलावात गाजले. जे प्रथम श्रेणी क्रिकेटमधले शेर होते. त्यांना कोट्यावधी रुपये देऊन आयपीएलमधल्या संघ मालकांनी विकत घेतले. या हंगामात सर्वात जास्त गाजला तो वरुण चक्रवर्ती
मिस्ट्रीमॅन या नावाने चर्चे असणाऱ्या वरुणने प्रथम श्रेणीत उत्तम गोलंदाजी करत आपले स्थान आयपीएलच्या बाराव्या हंगामात मिळवले.

प्रिती झिंटाच्या संघाने तर त्याला तब्बल ८ कोटी ४ लाख रुपये देऊन आपल्या संघात घेतले. मात्र, एक दुर्दैवी प्रकार घडला आहे. ज्या खेळूसाठी जवळपास साडे आठ कोटी रुपये मोजले पण त्या खेळाडूला आता आयपीएलमध्ये खेळता येणार नाही. त्यामुळे प्रितीसह कर्णधार आर आश्विनलाही मोठा धक्का बसला आहे.

पंजाबने वरुणला कोलकत्ता नाईट रायडर्सविरुद्ध खेळण्याची पहिली संधी दिली होती. या सामन्यात त्याने ३५ धावात एक गडी बाद केला होता. यानंतर या खेळाडूला एकही सामना खेळता आला नाही. दरम्यान, चेन्नई विरुद्धच्या सामान्यापूर्वी या खेळाडूच्या बोटाला दुखापत झाली. त्यानंतर वैद्यकीय तपासणीमध्ये बोटाला फ्रॅक्चर असल्याचे निष्पन्न झाल. ही दुखापत गंभीर स्वरुपाची असल्यामुळे त्याला या पुढील आयपीएलच्या सामन्यामध्ये खेळता येणार नाही.

https://twitter.com/lionsdenkxip/status/1118017579723808768

You might also like