निर्भया प्रकरण : तिहार तुरुंगात दोषींसाठी फाशीची ‘ट्रायल’, ‘त्याच’ तारखेला ‘फाशी’ ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींच्या फाशीची तयारी सुरु झाली आहे. त्यांनी मंडावलीहून तिहार तुरुंगात हलवण्यात आले आहे. जेथे इतर गुन्हेगार तुरुंगवास भोगत आहे. त्यांचा माफीचा अर्ज नाकारण्यात आल्यानंतर सर्व दोषींना लवकरच फासावर चढवण्याची शक्यता आहे.

आता अशी माहिती येत आहे की 16 डिसेंबरला फाशीची शिक्षा देण्यात येणार आहे. याची डमी ट्रायल सुरु आहे. परंतू अजूनही आरोपींनी फाशी देण्याचे पत्र तुरुंग प्रशासनाला आले नाही. निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपींची दया याचिका फेटाळण्यात आली आहे.

7 वर्षांपूर्वी 16 डिसेंबर 2012 साली निर्भयावर चालत्या बसमध्ये सहा नराधमांकडून कुकर्म करण्यात आले होती. या सहा आरोपींपैकी एका सोडून देण्यात आले. तर तिहारमध्ये एक आरोपी रामसिंगने आत्महत्या केली. तर उर्वरित चार दोषींना फाशीची शिक्षा देण्यात आली. तिहार तुरुंग प्रशासनाने डमीमध्ये 100 किलो वाळू भरुन चाचणी केली आहे. याचा हेतू असतो की फाशी देताना त्यांच्या वजनाने दोरी तुटेल का ?

फाशी देण्यासाठी तयार करण्यात येणारा दोरखंड वेगळा प्रकारचा असतो. देशात काही मोजक्या ठिकाणी हे दोरखंड तयार करण्यात येतात. दोरखंड तयार करण्याचे काम बिहारच्या बक्सरमध्ये सुरु आहे. 10 दोरखंड, जे फाशीसाठी वापरण्यात येणार आहेत त्याची ऑर्डर या कारागृहाला मिळाली आहे. याचाच वापर निर्भया प्रकरणातील दोषींना फाशी देण्यासाठी केला जाऊ शकतो.

तिहार तुरुंगातील सूत्रांनी माहिती दिली की, फाशी देण्यासाठी बक्सरवरुन दोरखंड मागवण्यात येणार नाहीत, तिहारमध्ये 5 दोरखंड आहेत. परंतू आम्ही बक्सर प्रशासनाशी चर्चा करत आहोत. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र किंवा बिहारहून फाशी देण्यासाठी फाशी देणारा बोलावण्यात येऊ शकतो. तिहार तुरुंगाच्या तुरुंग 3 मध्ये फाशी देण्याची जागा आहे.

Visit : Policenama.com 

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like