…म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या 10 वर्षीय मुलीचा केला ‘सन्मान’

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मूळ भारतीय असलेल्या दहा वर्षाच्या मुलीचा सन्मान केला आहे. ही 10 वर्षाची मुलगी कोरोना विरोधात लढणाऱ्या नर्स आणि अग्निशमन दल विभागाच्या कर्मचाऱ्यांना दररोज जेवण आणि कार्ड घेऊन जात होती. श्राव्या अन्नापारेड्डी (वय-10) असे ट्रम्प यांनी सन्मानित केलेल्या मुलीचे नाव आहे. श्राव्या ही ‘गर्ल स्काउट ट्रूप’ची सदस्या असून होनावर हिल्स एलीमेंट्री शाळेत इयत्ता चौथीमध्ये शिकते.

ट्रम्प यांनी कर्मचाऱ्यांना केले सन्मानित
राष्ट्रपती ट्रम्प आणि पहिली महिला मेलानिया ट्रम्प यांनी शुक्रवारी या मुलीसह कोरोना व्हायरस संकटाचा सामना करण्यासाठी तैनात असलेल्या जवानांना मदत करणाऱ्या अमेरिकन नायकांचा सन्मान केला. स्थानिक वृत्तपत्राला राष्ट्रपती कार्य़ालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार म्हटले आहे की, आम्ही आज ज्या पुरुष आणि स्त्रियांचा सन्मान करीत आहोत ते आपल्याला आठवण करून देतात की आपल्यातील स्नेह हे कठीण काळात एका नव्या उंचीवर घेऊन जाऊ शकतो.

कोण आहे श्राव्या अन्नापारेड्डी
ट्रम्प यांनी श्राव्या अन्नपारेड्डी हीच्या सोबत तीन मुलींना सन्मानित केले. या तीनजणी गर्ल स्काऊटच्या सदस्या आहेत. या तिघींनी स्थानिक डॉक्टर, नर्स आणि अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांना 100 जेवणाचे डबे घेऊन जात होते. तसेच या विद्यार्थीनी स्वत:च्या हाताने बनवलेले 200 कार्ड देखील त्यांना दिले आहेत. श्राव्या हिचे पालक आंध्र प्रदेशचे आहेत.