होलसेल दरात ड्रायफ्रूट्सच्या किंमतीत घट, जाणून घ्या काय आहे किंमत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कडाक्याच्या थंडीत ड्रायफ्रूटचा बाजार गरम आहे. त्याच वेळी, त्यांच्या किंमती खाली आल्या आहेत. कोरोनामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी, नागरिकांनी ड्रायफ्रूटचे सेवन देखील वाढविले आहे. बाजार तज्ज्ञ अनिल जैन यांच्या म्हणण्यानुसार, होलसेल किंमतीत घट होण्याचे मुख्य कारण म्हणजे डिसेंबर ते मार्च या कालावधीत मोठ्या संख्येने विवाहसोहळा नसणे. त्याचबरोबर लग्नाची मर्यादीत संख्या असल्यामुळे महानगरांमध्ये ड्रायफ्रुटचा वापर झपाट्याने कमी झाला आहे. मंदसौरसारख्या शहरांमध्ये ड्रायफ्रूटच्या किंमती कमी झाल्यामुळे विक्री 30 ते 40 टक्क्यांनी वाढली आहेत.

बदामाच्या किंमतीत 160 रुपये प्रतिकिलोपर्यंत घट- मागील वर्षी बदामाची किंमत प्रति किलो 680 रुपये होती, जी 520 रुपये प्रतिकिलोवर आली आहे. उद्योजक कैलाश जैन यांच्या मते, कोरोनामुळे जम्मू आणि दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात साठा शिल्लक आहे. यामुळे थंडीचा हंगाम असूनही यंदा दर 25 टक्क्यांनी खाली आले आहेत. गेल्या वर्षी हलक्या जातीचे बदाम 600 रुपये किलो होते, तर यावेळी ते 460 रुपये किलो झाली आहे, ड्रायफ्रूटच्या बाजारामध्ये काजूच्या किंमतीही 150 रुपयांनी खाली आल्या आहेत. मागील वर्षी 700 ते 850 किलो दराने विकल्या जाणाऱ्या काजूची किंमत 470 ते 700 रुपये प्रति किलो झाली आहे.

खजूरच्या किंमतीत 30 टक्क्यांपर्यंत वाढ- येथे, गरिबांचा मेवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खजुराच्या किंमतीत यावर्षी 25 ते 30 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. मागील वर्षी खजूर 60 ते 70 किलो वरून विकले गेले होते, जे यावर्षी 80 ते 90 किलो पर्यंत वाढले आहे.

आता फुटपाथवर विकले जात आहे ड्रायफ्रूट
ड्रायफ्रूट्सची मागील दोन-तीन वर्षांपासून फुटपाथवर विक्री होण्यास सुरुवात झाली आहे. मंदसौरमधील महू-नीमच रस्त्यावरील महाराणा प्रताप बसस्थानकापासून श्रीकोल्ड चाराहापर्यंत फेरीवाले फुटपाथवर ड्राय फ्रूटची विक्री करीत आहेत. विक्रेत्याला विचारले असता, ते थेट जम्मू आणि काटरातून सामान आणतात आणि अत्यल्प फायद्यासाठी विकतात. दुपार ते संध्याकाळपर्यंत ग्राहकांची चांगली गर्दी दिसून येत आहे.