वाहन उद्योगात ‘मंदी’ असताना ‘इथल्या’ बाजारात बैल जोडीची 7 लाख 21 हजाराला खरेदी !

संकेश्वर : वृत्तसंस्था – देशामध्ये वाहन उद्योगावर मंदीचे सावट असताना कर्नाटकातल्या संकेश्वर बाजारात मात्र जनावरांच्या किंमती तेजीत आहेत. संकेश्वर येथील मागील शुक्रवारच्या जनावर बाजारात बैलजोडीला तब्बल 7 लाख 21 हजार रुपये किंमत मिळाली आहे. संकेश्वर येथील दानप्पा कोरी व सोनू बेळवी यांची ही बैलजोडी सातारा येथील सागर शेठ यांनी विकत घेतली आहे.

वाहन उद्योगातील मंदीचा फटका ऑटोमोबाइल क्षेत्राला बसला आहे. खप नसल्याने डिलरकडे वाहने पडून राहण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे प्रमुख वाहन उत्पादक कंपन्यांनी खर्चात बचत करण्यावर आणि थेट ग्राहकांना सवलती देण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. अनेक कंपन्यांच्या दुचाकी, चारचाकी वाहनांच्या विक्रीत घट होत असल्याने उत्पादक चिंताग्रस्त असताना संकेश्वरच्या बैल बाजारात मात्र तेजी असल्याचे दिसून आले आहे.

मागील महिन्यात संकेश्वर येथे बेंदूर साजरा करण्यात आला. त्यावेळी दाती बैलजोडी या प्रकारामध्ये या बैलजोडीने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले होते. याच बरोबर परिसरातील अनेक स्पर्धांमधून या बैलजोडीने लाखो रुपयांची पारितोषिके पटकावली होती. खिलारी जातीची ही बैलजोडी 5 लाख 55 हजार रुपयांना खरेदी करण्यात आली होती. त्यांची योग्य निगा राखल्याने या बैलजोडीला संकेश्वर बाजारात मोठी किंमत मिळाली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –