प्रत्येक युगात काहीना काही ‘आव्हाने’ येतात, ‘कोरोना’ व्हायरस असेच एक ‘आव्हान’ : PM नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत एका कार्यक्रमात म्हटले की, प्रत्येक युगात काही ना काही आव्हाने येत असतात आणि ही आव्हाने आपली ताकद अजमावण्यासाठी येत असतात. कोविड-19 सुद्धा असेच एक आव्हान आहे. विरोधकांवर निशाणा साधताना मोदी म्हणाले, काही लोक निष्क्रियतेला सर्वात सोपी कारवाई मानतात. परंतु, आमच्यासाठी सुशासनाचा विकास आणि वितरण सुविधा हा विश्वास आहे.

सीडीएस सशस्त्र दलांमध्ये ताळमेळ आणणार
पंतप्रधान म्हणाले, आम्ही चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) बाबत ऐकले होते. आम्ही हे पद निर्माण केले आणि कोंडी दूर केली. चीफ ऑफ डिफेंस स्टाफ सशस्त्र दलांमध्ये ताळमेळ ठेवेल. मोदी म्हणाले, युग आपल्या भावना अजमावण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी आव्हाने घेऊन येते. सध्या कोविड-19 जगाच्या समोर एक मोठी समस्या आहे.

निर्वासिंतासाठी बोलणार्‍यांच सीएएला विरोध
ते म्हणाले, संपूर्ण जगात निर्वासितांच्या अधिकारावर बोलणारे लोक निर्वासितांसाठी तयार करण्यात आलेल्या सीएएला विरोध करत आहेत. प्रत्येक गोष्टीत हे लोक संविधानाचा उल्लेख करतात, आणि कलम 370 रद्द करून जम्मू-काश्मीरमध्ये संविधान लागू करण्यास विरोध करतात.

देश परिवर्तनातून जात आहे
पीएम मोदी म्हणाले, अर्थव्यवस्था असो की समाज, आज देश एका मोठ्या परिवर्तनातून जात आहे. मागील काही वर्षात भारत जागतिक अथव्यवस्थेचा एक मजबूत भाग बनला आहे. परंतु, विविध कारणांमुळे जागतिक स्थिती अशी आहे की, जागतिक अर्थव्यवस्था कमजोर आणि कठीण स्थितीत आहे.

भारत तटस्थ राष्ट्र
मोदी म्हणाले, भारत एक तटस्थ राष्ट्र आहे, तो सौदी अरब आणि इराणचा मित्र आहे तसेच अमेरिका आणि रशियासुद्धा त्याच्यासोबत मैत्री करते.