Pritam Munde | ‘अन् मलाई खायला मी…’; प्रितम मुंडेंच्या ‘त्या’ विधानाची होतेय जोरदार चर्चा.

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या दोन्ही कन्या राजकारणात सक्रिय आहेत. एखाद्या कार्यक्रमात एकत्र आल्या असता पंकजा मुंडे व प्रितम मुंडे (Pritam Munde) या दोघी एकमेकींची खूप स्तुती करतात. एका कार्यक्रमादरम्यान नाशिक येथे गेल्या असता खासदार प्रितम मुंडे (Pritam Munde) यांनी पंकजा मुंडेंबाबत एक विधान केले आहे. ते विधान चांगलेच व्हायरल झाले असून त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

 

नाशिक येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधताना खासदार प्रितम मुंडे (Pritam Munde) म्हणाल्या, “आज ‘सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास’ हा भारतीय जनता पक्षाचा नारा आहे. पण हा नारा प्रत्यक्षपणे ४० वर्षे ज्यांनी आपल्या राजकीय आयुष्यात एक व्यक्ती जगली. आणि ती व्यक्ती म्हणजे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब आहेत. माझा जन्म त्यांच्या घरी झाला, त्यामुळे माझ्याइतकं भाग्यवान कुणी नाही, असं मला वाटतं. आणि त्याहीपेक्षा माझं मोठं भाग्य म्हणजे माझा जन्म पंकजाताईंच्या पाठीवर झाला. कारण सगळे घाव झेलायला ताई आहे, आणि त्याची सगळी मलाई खायला मी आहे.” असा गौरवोद्गार प्रितम मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्याबद्दल बोलताना काढला.

त्यापुढे बोलताना प्रितम मुंडे (Pritam Munde) म्हणाल्या, “समोर बसलेले विद्यार्थी म्हणत असतील की, हे काय तुम्ही सांगत आहात.
आयुष्यात संघर्ष करा, कष्ट करा, हे गोपीनाथ मुंडेंच्या घरी जन्मलेल्या मुलींनी व्यासपीठावर बसून सांगू नये,
असं काहींना वाटत असेल. पण माझा येथे बसलेल्या विद्यार्थ्यांना एक प्रश्न आहे. ठीक आहे…
आम्ही नशिबवान आहोत. कारण माझा किंवा राहुल कराडचा आमच्या घरी जन्म झाला.
पण गोपीनाथ मुंडे कुठल्या मोठ्या माणसाच्या घरी जन्मले नव्हते किंवा विश्वनाथ कराड कुठल्या दिग्गज माणसाच्या घरी जन्मले नव्हते.
त्यामुळे तुम्हाला राहूल कराड व्हायचयं की विश्वनाथ कराड व्हायचयं हा तुमचा निर्णय आहे.
तसेच तुम्हाला प्रितम मुंडे (Pritam Munde) व्हायचयं की गोपीनाथ मुंडे व्हायचय हा तुमचा निर्णय आहे.
आणि जर तुम्ही ठरवलचं तर तुम्ही गोपीनाथ मुंडे किंवा विश्वनाथ कराड का होऊ शकत नाहीत? ही जिद्द मनाशी बाळगा आणि तुमच्या ध्येयाकडे वाटचाल करा.
असे केले तर तुम्ही निश्चित यशस्वी व्हालं.” असा सल्ला यावेळी बोलताना त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला.

 

Web Title :- Pritam Munde | bjp mp pritam munde on pankaja munde relation in nashik speech

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Jalgaon ACB Trap | 20 हजार रुपये लाच स्वीकारताना भूमी अभिलेख कार्यालयातील लिपिक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Ajit Pawar | अजित पवारांनी गोपीचंद पडळकरांना फटकारलं, म्हणाले – ‘लोकप्रतिनिधी झाला म्हणजे शिंगे फुटली का?’

Lady Police Constable Suicide | धक्कादायक! नाईट ड्युटीवरुन येताच महिला पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या