Prithvi Shaw | पृथ्वी शॉचे रणजी मध्ये द्विशतक ! निवड समितीला मोठी चपराक

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Prithvi Shaw | देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावा करूनही निवड समितीने पृथ्वी शॉला भारतीय संघात समावेश केलेला नाही. अशा परिस्थितीत ही खेळी निवडकर्त्यांना जोरदार चपराक समजली जात आहे. 2018 मध्ये कसोटी पदार्पणात शतक झळकावणारा पृथ्वी जुलै 2021पासून आंतरराष्ट्रीय व्हाईट बॉल फॉर्मेटमधून बाहेर आहे. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेला गेलेल्या भारतीय संघात त्याला स्थान देण्यात आले होते. (Prithvi Shaw)

 

रणजी ट्रॉफटीमध्ये आसाम आणि मुंबई यांच्यात सामना खेळवला जात आहे. पृथ्वी शॉने या सामन्यात शतक झळकावत चांगलीच सुरवात केली आहे. 2023 मधील पहिले आणि त्याच्या प्रथम श्रेणी क्रिकेट कारकिर्दीतील 12 वे शतक ठोकले आहे. आसामविरुद्धच्या एलिट गटाच्या सामन्यात मुंबईच्या फलंदाजाने हा पराक्रम केला. या सामन्यात स्टार फलंदाज पृथ्वी शॉने दमदार खेळी करत द्विशतक झळकावले आहे. या द्विशतकासह पृथ्वीने आपण पुन्हा एकदा उत्तम फलंदाज असल्याचे दाखवून दिले आहे. आसाम विरुद्धच्या सामन्यात मुंबईकडून खेळत असलेल्या पृथ्वी शॉने आतापर्यंत 250 चेंडूत 213 धावांची नाबाद खेळी केली आहे. (Prithvi Shaw)

 

पृथ्वी शॉने भारतासाठी आतापर्यंत 5 कसोटी सामने, 6 एकदिवसीय आणि T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
कसोटी सामन्यांच्या 9 डावात त्याने 42.37 च्या सरासरीने 339 धावा केल्या आहेत.
यामध्ये एक शतक आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे.
याशिवाय पृथ्वीने 6 एकदिवसीय सामन्यांमध्ये 31.50 च्या सरासरीने 189 धावा केल्या आहेत.
त्याच वेळी, त्याच्या एकमेव T20 सामन्यात, त्याने फक्त एक चेंडू खेळला, ज्यामध्ये तो खाते उघडू शकला नाही.
पृथ्वी शॉ अनेक दिवसांपासून टीम इंडियात पुनरागमनाची संधी शोधत आहे.
जुलै 2021 मध्ये पृथ्वीने भारतीय संघासाठी शेवटचा सामना खेळला होता.

 

Web Title :- Prithvi Shaw | prithvi shaw scored fabulos double century in ranji trophy cricket

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Political Crisis | सत्तासंघर्षावर अजित पवारांची प्रतिक्रिया म्हणाले, ‘न्यायव्यवस्थेला कोणी…’

Ajit Pawar | अजित पवार यांचा शिंदे-फडणवीस सरकारला इशारा; म्हणाले…

Pune Pimpri Crime | मला तू कॉलेजपासून आवडते म्हणत महिलेसोबत गैरवर्तन, आरोपी गजाआड; तळेगाव दाभाडे येथील घटना