पोलीसनामा ऑनलाईन टीम – बॉलिवूडची स्टार अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) ही सध्या हॉलिवूडमध्येही आपली जादू पसरवत आहे. प्रियांका चोप्रा आंतराष्ट्रीय पातळीवर भारताचं प्रतिनिधित्व करत आहे. तिचा स्वतःचा एक अफाट मोठा चाहतावर्ग आहे. देसी गर्ल प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि निक जोनास हे सेलिब्रिटी कपल जानेवारी 2022 मध्ये आई वडील झाले. त्यांना एक गोंडस लेक आहे.
प्रियांका आणि निकने आपल्या लाडक्या लेकीचं नाव ‘मालती मॅरी’असं ठेवलं. प्रियांका चोप्राने स्वतः बाळाला जन्म न देता सरोगसीचा पर्याय स्वीकारला. जन्मानंतर प्रियांकाची मुलगी फारच कमकुवत होती. तिला जवळजवळ महिनाभर रुग्णालयातच ठेवण्यात आला होतं. मात्र आता ती एक वर्षाची झालीये आणि फारच उत्तम आहे. प्रियांका आपल्या मुलीसोबतचे फोटो नेहमी सोशल मीडिया वर टाकत असते मात्र, ती नेहमीच फोटोत मालतीचा चेहरा लपवते. त्यामुळे खूप दिवसांपासून चाहत्यांना प्रियांकाच्या लेकीला पाहण्याची उत्सुकता होती.
प्रियांकानेदेखील अनुष्का आणि सोनमप्रमाणे नो फोटो पॉलिसी पाळली होती. त्यामुळे तिची मुलगी मालती मेरी हि नेमकी कशी दिसते हे पाहण्यास सगळेच आतुर होते. मात्र आता प्रियांकाने (Priyanka Chopra) स्वतः आपल्या लेकीचा चेहरा जगासमोर उघड केला आहे. प्रियांकाने एका पुरस्कार सोहळ्यादरम्यान आपल्या लेकीला घेऊन गेलेला व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये मुलगी मालतीचा चेहरा स्पष्ट दिसून येत आहे. डोक्याला पांढरा रंगाचा पट्टा आणि क्रीम कलरचा ड्रेस या वेशात तिची मुलगी खूपच गोड दिसतेय.
Web Title :- Priyanka Chopra | priyanka chopra revealed daughter malati chopras face see viral video
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update