Pune Crime News | भांडणे सोडवण्यासाठी आलेल्या व्यक्तीच्या डोक्यात घातला दगड, तीन जणांवर FIR; कोथरुडमधील घटना

0
636
Pune Crime News | Stone thrown on head of person who came to settle quarrel, FIR against three persons; Incidents in Kothrud
file photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | काही कारण नसताना तरुणाला बोलावून घेत त्याला हाताने बेदम मारहाण (Beating) केली. त्यावेळी मुलाला सोडवण्यासाठी गेलेल्या वडिलांच्या डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केले. याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार (Pune Crime News) क्रांतीसेना कमान सुतारदरा कोथरुड (Kothrud) येथे रविवारी (दि.29) दुपारी साडेचारच्या सुमारास घडली.

 

गोरक्ष पडवळ (वय-50 रा. क्रांतीसेना कमान, सुतारदरा, कोथरुड) हे जखमी झाले आहेत. याबाबत मुलगा अनिकेत गोरक्ष पडवळ (वय-20) याने कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) सोमवारी (दि.30) फिर्याद दिली आहे. याप्रकरणी सुरज दिलीप शिंदे (वय-28), सचिन मातेरे, साठे (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) यांच्या विरुद्ध आयपीसी 326, 323, 504, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिकेत पडवळ हा रविवारी दुपारी साडेचारच्या सुमारास सार्वजनिक रोडवरुन जात होता.
त्यावेळी आरोपी सुरज शिंदे याने अनिकेतला बोलावून घेतले.
काही एक कारण नसताना ‘तुला लय माज आला आहे काय?’ म्हणत त्याला शिवीगाळ करुन हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली.
त्यावेळी अनिकेतचे वडिल गोरक्ष पडवळ हे भांडण सोडवण्यासाठी मध्ये आले.
त्यावेळी आरोपींनी संगनमत करुन त्यांनाही हाताने मारहाण केली. तर साठे याने दगड डोक्यात मारुन गंभीर जखमी केले.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक माळी (PSI Mali) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime News | Stone thrown on head of person who came to settle quarrel, FIR against three persons; Incidents in Kothrud

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Anil Parab | ‘नोटीस काढणाऱ्या अधिकाऱ्याला बोलवा..;’ म्हणत, शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी घेतले म्हाडाच्या सीईओला फैलावर

Maharashtra Cabinet Meeting | शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले 15 महत्वाचे निर्णय, जाणून घ्या सविस्तर

Pune Crime News | जबरी चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यातील अट्टल गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक